Suman Patil Jayant Patil Tembhu Scheme esakal
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil : भाजप खासदाराच्या आरोपानंतर NCP प्रदेशाध्यक्षांनी केली आमदार सुमन पाटलांची पाठराखण; काय आहे कारण?

गांधी जयंतीपासून सुरू होणाऱ्या उपोषणाला वेगळे वळण मिळाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

आमदार सुमन पाटील यांनी २ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

तासगाव : ‘‘आमदार सुमन पाटील (Suman Patil) यांना श्रेय मिळू नये, यासाठी आमचे सरकार बदलल्यानंतर तासगाव तालुक्यातील टेंभू योजनेंतर्गत (Tasgaon Tembhu Scheme) आठ गावांचा प्रश्न दुर्लक्षित केल्याने त्यांना उपोषण करावे लागत आहे,’’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

त्यामुळे गांधी जयंतीपासून सुरू होणाऱ्या उपोषणाला वेगळे वळण मिळाले आहे. आमदार श्रीमती पाटील यांनी तासगाव तालुक्यातील शेतीच्या पाणीप्रश्नासाठी गांधी जयंतीपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर उलट-सुलट राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांनी रोहित पाटील यांच्यासाठी आमदार सुमन पाटील यांची धडपड सुरू असल्याचा शुक्रवारी आरोप केला. मात्र जयंत पाटील यांनी आमदार श्रीमती पाटील यांची पाठराखण केली आहे. माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आमदार सुमन पाटील यांनी मतदारसंघातील ज्या गावांना अद्याप पाणी मिळाले नाही. त्यांना पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न केल्याचे आणि त्याला मंजुरी मिळण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत.

त्याला आमचे सरकार असताना मंजुरी मिळाली. मात्र त्याचे श्रेय श्रीमती पाटील यांना मिळता कामा नये, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितल्याने त्यांच्या गांधी जयंतीपासून सुरू होणाऱ्या उपोषणाला नैतिक पाठबळ मिळाल्याचे मानले जात आहे.

आमदार सुमन पाटील यांची पाठराखण

तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यातील काही गावे अद्याप टेंभू, म्हैसाळ, ताकारी योजनेमध्ये समाविष्ट नाहीत. या पार्श्वभूमीवर ही गावे शेतीसाठीच्या पाणी योजनांमध्ये समाविष्ट करावी. या मागणीसाठी आमदार सुमन पाटील यांनी २ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. या विषयावर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार सुमन पाटील यांची पाठराखण केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT