jayant patil sakal
पश्चिम महाराष्ट्र

जयंत पाटील यांना इस्लामपूर न्यायालयात जामीन मंजूर

पोलिसांनी तपास करून इस्लामपूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर दोषारोपपत्र दाखल केले होते

सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर : शिगाव येथील एका प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात माजी जलसंपदामंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना येथील न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. जामीन घेण्यासाठी आज दुपारी ते स्वतः न्यायालयात हजर होते.

याबाबतची माहिती अशी, सन २०१८ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या एका वादातून शिगाव (ता. वाळवा) येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते व विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते. त्यावेळी जयंत पाटील यांनी शिगाव येथे रस्त्यावरच ठिय्या मारला. मुंबई पोलिस अधिनियमानुसार जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आष्टा पोलिसात श्री. पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपास करून इस्लामपूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर दोषारोपपत्र दाखल केले होते.

त्याबाबतची नोटीस पाठवण्यात आली होती. शुक्रवारी (ता. २२) दुपारी जयंत पाटील न्यायालयात हजर राहिले. जामिनाची पूर्तता केली. संदीप माने हे त्यांना जामीन राहिले, तर ॲड. आर. डी. कोपर्डे व ॲड. विजय काईंगडे यांनी वकीलपत्र दिले. पुढील सुनावणी ऑगस्ट महिन्यात होणार आहे. श्री. पाटील यांच्या राजकीय जीवनात प्रथमच गुन्हा नोंद असून ते जामिनासाठी स्वतः न्यायालयात हजर राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT