islampur Municipal Council
islampur Municipal Council sakal
पश्चिम महाराष्ट्र

जयंतराव आकसाचे राजकारण करू नका - निशिकांत भोसले

सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर : जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रकाश हॉस्पिटल वर किमान १०० गुन्हे दाखल करण्याचे टार्गेट दिले आहे .जयंतराव आकसाचे राजकारण करू नका , संस्थात्मक पातळीवर उतरू नका ,राजारामबापू कारखान्याची साखर स्वताचे बंधू व पत्नी व नातेवाईक असलेल्या कंपनी मार्फत अफगाणिस्थान मधून बंदी असतानाही पाकिस्तान मध्ये कशी विकली व त्याचे पैसे हवाल्याने दुबईत कसे घेतले याची फाईल आमच्या कडे पण आहे.संस्थात्मक पातळीवर उतरला तर आमच्या कडे पण तुमच्या सर्व संस्थामधील कारभाराच्या फाईल तयार आहेत .लवकरच नाईलाजाने त्या घेऊन तुमचा बुरखा फाडावा लागेल असा घणाघात इस्लामपूर चे नगराध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील यांनी पत्रकार बैठकीत केला .

प्रकाश शिक्षण संकुलात आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते .ते म्हणाले, जयंतारावांना जिल्ह्यात यांच्या पेक्षा चांगले व वेगळे केलेले पाहवत नाही .आपल्या पुढच्या पिढीला त्रासदायक होणाऱ्या जिल्ह्यातील सर्व युवा राजकीय पिढीला ते सत्येच्या ताकदीवर दाबण्याचा प्रयत्न करत आहेत .राजकारण हे ठरावीक पातळीपर्यंत असावे मात्र जयंत पाटील हे विरोधक मोठा होऊ नये म्हणून ते खालच्या पातळीवर उतरून करतात .आमच्या हॉस्पिटल मध्ये कोरोना काळात सेवा करणाऱ्या डॉकटर व कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करून ते काय साध्य करत आहेत.संस्थात्मक पातळीवर राजकारण आणू नका .

आमच्या कॅम्पस मध्ये १६४० कर्माचारी आहेत .त्यांचे कुठुम त्याच्यावर चालते.३५०० विध्यार्थी देशाच्या कानाकोपऱ्यातुन येऊन शिक्षण घेतात .अनेकांचे संसार त्यावर अवलंबून आहेत .कृपा करून हे खुनशी राजकारण थांबवा .कदाचित मी तुम्हाला शत्रू वाटत असेल, पण मी कुणाला शत्रू मानत नाही .गुन्हे दाखलच करायचे असतील तर माझ्यावर करा संस्थात्मक पातळीवर उतरू नका .नाहीतर संघर्ष अटळ आहे.संघर्ष मला नवीन नाही .मी हे जे काय केलेय ,ते स्वताच्या जीवावर उभे केले आहे .

आपण कोविड काळात एखादे तरी हॉस्पिटल उभे केले का? ते म्हणाले, सांगली जिल्हा हा चांगल्या नेत्यांच्या व प्रगल्भ राजकारण्यांचा म्हणून ओळखला जातो ,मात्र ती ओळख आपण सत्येच्या जीवावर खुनशी राजकारण करून पुसू नका.आपल्याही काही संस्था आहेत त्यात ला कारभार कसा चालतो यांच्या सर्व फाईल तयार आहेत .आम्हाला संस्थात्मक पातळीवर उतरायला भाग पाडू नका .तुमच्या अनेक भानगडी आमच्याकडे पुराव्यानिशी आहेत .यातील एक अफगाणिस्थानातील साखर ,पाकिस्तानात नेऊन त्याचे पैसे स्वताच्या नातेवाईकांच्या कंपनीला दुबईतून कसे आले ,याची इथम्बुत माहिती आमच्याकडे आहे .त्यामुळे याचा विचार आपण नक्की करावा .

यावेळी वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे,वाळवा तालुका भाजपा ओबीसी सेल चे अध्यक्ष मधुकर हुबाले,सांगली जिल्हा भाजपा सरचिटणीस संजय हवलदार,भाजपा शहर अध्यक्ष अशोकराव खोत,वाळवा तालुका भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखाताई जगताप,वाळवा तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष सतेज पाटील,प्रांजली अर्बन निधी बॅकेचे चेअरमन संदीप सावंत,वाळवा तालुका भाजपाचे उपाध्यक्ष निवास पाटील,अजित पाटील,सरचिटणीस दादासाहेब रसाळ,अक्षय कोळेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT