jayant patil 
पश्चिम महाराष्ट्र

जयंत पाटलांनी घेतली सोलापूर झेडपीतील पराभवाची माहिती 

प्रमोद बोडके

सोलापूर : कागदोपत्री भक्कम असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत पराभव झाला आहे. या पराभवाची माहिती प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांच्याकडून घेतली आहे. घेतलेल्या माहितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस काय कार्यवाही आणि कारवाई करणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व कॉंग्रेसकडे आवश्‍यकते पेक्षा जास्त संख्याबळ होते. या निवडीबाबत राष्ट्रवादीतील कोणीच सर्वार्थाने पुढाकार घेतला नाही त्यामुळे पराभव झाला असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांना सांगण्यात आले आहे.सुरवातीच्या टप्प्प्यात महाविकास आघाडीने त्यांच्या सदस्यांशिवाय स्थानिक आघाड्या व अपक्षांचीही जुळवाजुळव केली होती. महाविकास आघाडी विशेषतः: राष्ट्रवादीकडून त्या सदस्यांना विश्‍वास न मिळाल्याने हे सदस्य पुन्हा भाजप व समविचारी आघाडीच्या गोटात मिळाले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे. 
हेही वाचा : 
सभापतीच्या निवडी होणार 15 जानेवारी पूर्वी 
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजप व समविचारीकडून अनिरुद्ध कांबळे व उपाध्यक्षपदी दिलीप चव्हाण यांची वर्णी लागली आहे. अनपेक्षितरीत्या पुढे आलेली नावे आणि मिळालेली संधी यामुळे जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. विषय समित्यांच्या सभापतिपदी कोणाकोणाची वर्णी लागणार? या कडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 13 ते 15 जानेवारी दरम्यान या निवडीसाठी विशेष सर्वसाधारण सभा होण्याची शक्‍यता आहे. 
अध्यक्ष निवडीची सभा झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत सभा घेऊन विषय समिती सभापती निवडावे लागतात. जिल्हा परिषद अध्यक्षांकडे जलव्यवस्थापन आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद असते. कृषी व पशुसंवर्धन, शिक्षण व आरोग्य, महिला व बालकल्याण, अर्थ व बांधकाम व समाजकल्याण अशा पाच समित्या आहेत. जिल्हा परिषद उपाध्यक्षांकडे एक समिती असल्याने उर्वरित चार समित्यांसाठी सदस्यांमधून सभापतींची निवड केली जाते. 
हेही वाचा : 
अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत भाजपचे व समविचारीचे वर्चस्व असल्याने विषय समित्यांच्या सभापती निवडीतही हे वर्चस्व कायम राहते का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. अध्यक्ष निवडीत माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार राजेंद्र राऊत, आमदार शहाजी पाटील, सभापती विजयराज डोंगरे, अक्कलकोट तालुक्‍यातील भाजपच्या सदस्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे सभापती निवडीत कोणाला संधी मिळते याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. 
हेही वाचा : 
चर्चा विरोधी पक्षनेत्याची 
अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पुन्हा पराभव झाल्याने जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद पुन्हा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे जवळपास आता निश्‍चित झाले आहे. जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशी दोन्हीही पदे सध्या बळिराम साठे यांच्याकडे आहेत. विरोधी पक्षनेते पदावर कोणाला संधी मिळणार? याबद्दलही कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT