jayant patil on visit navkhed sangli and photo shoot with child rudra jangam in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

जयंत पाटील यांनी चिमुकल्यासोबत केले फोटोसेशन

सकाळ वृत्तसेवा

सांगली : जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज मतदारसंघातील नवेखेड दौऱ्यावर आले असता एका चिमुकल्याने त्यांना 'मला तुमचा फोटो काढायचा आहे' अशी विनंती केली. रुद्र जंगम या मुलाच्या आग्रहा खातर त्यांनी त्याच्या सोबत फोटोसेशन केले. यावेळी पाटील यांनी फोटो चांगला आला पाहिजे असे उद्गार  काढले. 

त्यांनी आपल्या ट्विटमधुन रुद्र सोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. दौऱ्यादरम्यान त्यांनी या चिमुकल्यासोबत वेळ घालवला आणि त्याच्यातच ते काही काळ रमले. या मुलासाठीही हा क्षण अविस्मरणीय ठरणार आहे. यावेळी 'त्याने माझा फोटो काढला आणि फोटो काढून झाल्यावर अगदी स्वतःहून कवितेप्रमाणे तोंडपाठ असलेले मंगलाष्टक देखील म्हणून दाखवले!' असेही त्यांनी सांगितले आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT