Jaysingpur police station investigat theft
Jaysingpur police station investigat theft 
पश्चिम महाराष्ट्र

"चाली'वरून लागला पोलिस ठाण्यातील चोरीचा छडा 

सकाळ वृत्तसेवा


"चाली'वरून लागला पोलिस ठाण्यातील चोरीचा छडा 

जयसिंगपूर (कोल्हापूर) ः  जिल्ह्यातील पोलिस दलात खळबळ उडवून देणाऱ्या जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील मोबाईल आणि रोकड चोरीप्रकरणी संशयितांच्या मुसक्‍या आवळण्यात अखेर यश आले. संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असून मोबाईल नष्ट करण्यासाठी त्याला आणखी एकाची साथ मिळाली. रघुनाथ बाळासो कदम (वय 28, सातवी गल्ली, जयविजय चौक, राजीव गांधीनगर, जयसिंगपूर) मुख्य संशयित असून मोबाईल नदीत टाकण्यास मदत करणाऱ्या विकास ऊर्फ पवन विलास पाटील (वय 21, रा. जयविजय चौक, राजीव गांधीनगर) यांना अटक केली आहे. 
दरम्यान, अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीपात्रात शोधमोहिम राबवून मुद्देमाल हस्तगत केला. संशयितांनी गुन्हा कबूल केल्याची माहिती, उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे आणि पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी पत्रकार बैठकीत दिली. 
आठ जानेवारीच्या मध्यरात्री चोरीची घटना घडली होती. यात 185 मोबाईल चोरीस गेले होते. नांदणी सहकारी बॅंकेच्या येथील शाखेच्या बाहेरील सीसीटीव्हीत एकटा चोरटा कैद झाला होता. फुटेज हा एकमेव दुवा होता; मात्र चेहरा अस्पष्ट असल्याने तपासात अडचणी होत्या. अखेर संशयितांच्या चालीवरून माग लावण्यात पोलिसांना यश आले. 
श्री. काळे व श्री बोरिगिड्डे म्हणाले, ""श्रीमाता सोसायटीत 24 ऑगस्ट रोजी चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी कदम याला अटक केली होती. पोलिसांनी त्याचे दोन मोबाईल तपासासाठी ताब्यात घेतले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर चार नोव्हेंबरला एक मोबाईल परत दिला होता. याकाळात कदम याने पोलिस ठाण्याची पाहणी केली होती. त्यानुसार त्याने ही चोरी केली असून त्याने कबूलीही दिली आहे. त्याच्यावर जयसिंगपूर ठाण्याच्या हद्दीत एक तर शिरोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन गुन्हे दाखल आहेत. चौकशीत त्याला मदत करणाऱ्या पाटील याने उदगाव, चिंचवाडमार्गे अर्जुनवाड-मिरज दरम्यानच्या कृष्णा नदीवरील पुलावरुन मोबाईल पाण्यात टाकल्याचे स्पष्ट झाले असून शोधमोहीम राबवून मुद्देमाल हस्तगत केला. 
जिल्हा पोलिसप्रमुख अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, पेठवडगावचे पोलिस निरीक्षक प्रदीप काळे आदींनी तपास केला. 

चालीवरून तपासाला फुटले "पाय' 
पोलिस ठाण्यातील चोरीमुळे तपासाचे आव्हान होते. फुटेज हा एकमेव दुवा पोलिसांकडे होता; मात्र अस्पष्ट फुटेजमुळे पुन्हा तपासात विघ्न आले; पण पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने संशयिताची चाल लक्षात घेतली आणि आरोपींपर्यंत पोचण्याचे काम सोपे झाले.

दहा पथकांकडून तपास 
पोलिस ठाण्यातील चोरीच्या तपासाचा यंत्रणेवर मोठा दबाव होता. कोल्हापूर आणि सांगलीच्या एलसीबीसह जयसिंगपूर, शिरोळ, हातकणंगले, पेठवडगाव पोलिसांनी आठ दिवसांपासून दिवसरात्र तपास कार्याला गती देऊन संशयिताचा माग काढलाच. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT