पश्चिम महाराष्ट्र

खेटे बंदोबस्त म्हणजे जोतिबा चैत्र यात्रेची पूर्वतयारी

निवास मोटे

जोतिबा डोंगर - येथील खेट्यातील पोलीस बंदोबस्त म्हणजे जोतिबा चैत्र यात्रेची पूर्वतयारी असते. यातून पोलीस यंत्रणेची एक रंगीत तालीम पूर्ण होऊन जाते, असे शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी सांगितले. जोतिबा खेटे एक अनुभव यावर बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. 

श्री पाटील म्हणाले, खेटे निमित्ताने स्थानिक ग्रामस्थ, पुजारी, देवस्थान समितीचे कर्मचारी यांना पोलिस यंत्रणा, कर्मचाऱ्यांचा परिचय व्हावा हा उद्देश असतो. त्याचा उपयोग जोतिबा देवाची चैत्र यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी होतो. खेटे यात्राकाळात पोलीस यंत्रणेस बारकाईने अभ्यास करता येतो. चैत्रात गर्दीचा ट्रेड कसा राहील. याचा बारकाईने अभ्यास या यात्रेत केला जातो. 

श्री. पाटील हे तासगाव तालुक्‍यातील अंजनी गावचे असून 1992 पासून माघ महिन्यात दरवर्षी पाच खेटे घालतात. खेटे घातल्यामुळे भाविकांना एक नवीन ऊर्जा मिळते. येथील गर्दी, निसर्गरम्य वातावरणाचा घेण्यासारखे असते. एकदा खेट्यात सहभागी झाल्यानंतर पुन्हा पुन्हा याचा आनंद घ्यावा असे वाटते. 

जोतिबा डोंगरावरील पुरणपोळी विषयी श्री पाटील म्हणाले, जोतिबा डोंगरावरील पुरणपोळीचा स्वाद अविस्मरणीय असून खास पुरण पोळी खाण्याकरीता लांबून भाविक येतात. येथील गुलाल, खोबरे, दवण्याचा सुगंधी वेगळाच आहे. पुरणपोळी सोबत तयार करण्यात येणारी आमटीचीही चवजबरदस्त असते. कोणताही मसाला न घालता ही आमटी येथील महिला, भगीनी तयार करतात. केवळ चटणी, मीठ, ओले खोबरे, कोंथबीर, आले, लसून या आमटीसाठी वापरला जातो. पुजारी मंडळी जीव ओतून पुरणपोळीचा नैवद्य तयार करतात आणि आनंदाने भाविकांना जेवू घालतात. 

भाविकांना आवाहन 
काही भाविक मंडळी कळत नकळत डोंगरावर येण्याजाण्याच्या मार्गावर काडी पेटवणे, सिगरेट पेटवून टाकणे असे प्रकार करतात .त्यामुळे डोंगरावर आग लागण्याच्या घटना घडतात. या आगीत गवताच्या गंज्या जळतात. सरपटणारे प्राणी, पशु, पक्षीही मरतात. शेतीचे नुकसान होते. याचा विचार करून अशा घटना टाळण्याचा प्रयत्न भाविकांनी करावा.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT