The journey from Ukhlu to Udgiri will be a distance of 20 km 
पश्चिम महाराष्ट्र

उखळू ते उदगिरी 20 किलोमीटर अंतराची होणार जंगल सफर 

शिवाजी चौगुले

शिराळा : चांदोली उद्यान अंतर्गत शाहूवाडी तालुक्‍यातील उखळू ते उदगिरी या 20 किलोमीटर अंतराच्या जंगल सफारीची जलसंपदामंत्री जयंत पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. 

वारणावती (ता. शिराळा) येथे वन्यजीव विभागाच्या कार्यालयात जंगल सफारी प्रारंभ झाला. वन्यजीव विभाग चांदोली व उखळू ग्राम परिस्थितीकी विकास समितीतर्फे या जंगल सफरीचे आयोजन केले आहे. सध्या शिराळा तालुक्‍यातील झोळंबी येथे 21 किलोमीटर जंगल सफारी सुरू आहे. आता शाहूवाडी तालुक्‍यातील उखळूपासून उदगिरीपर्यंत ही जंगल सफारी सुरू झाल्याने मणदूर प्रमाणे उखळू येथील स्थानिक युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. या जंगल सफारीसाठी 16 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

यावेळी वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर समाधान चव्हाण, विभागीय वनाधिकारी महादेव मोहिते, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, उप अभियंता मिलिंद किटवाडकर व महेश चव्हाण, शाखा अभियंता तानाजी धामणकर, वनक्षेत्रपाल जी. एच. लंगोटे, वनपाल डी. के. यमगर, एच. ए. गारदी, मणदूरचे सरपंच वसंत पाटील, उखळूचे सरपंच राजू मुटल, मोहन पाटील, राजू वडम, श्रीपती अनुते, संजय वडाम, सदाशिव वडाम, बाजार समितीचे संचालक दिनकर दिंडे उपस्थित होते. 

प्रवेश शुल्क  
12 वर्षांआतील मुलांना 15 व प्रौढ 30 रुपये प्रती व्यक्ती, 1200 रुपये सफारी वाहन व वाहन प्रवेश शुल्क 100 रुपये 
गाईड शुल्क 200 रुपये शैक्षणिक सहलीसाठी शालेय विद्यार्थी 10 व कॉलेज विद्यार्थी 20 रुपये प्रत्येकी शुल्क रहाणार आहे. वारणावती येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयात पर्यटकांना पास मिळणार आहेत. 

 हे पाहता येणार 
तांबवे टॉवर 
उदगिरी मंदिर 
कोकण दर्शन 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

Ghodegaon News : घोडेगावच्या पाणी साठवण तलावात बुडून तीन मुले ठार; दहा वर्षिय रिहान शेख बचावला

Team India Schedule: भारताच्या वेळापत्रकात आणखी एक दौरा... वैभव सूर्यवंशीला या संघात नक्की जागा मिळणार

Pune News : पुणे महापालिकेच्या तिजोरीत ५ हजार ३२६ कोटी; मिळकतकरातून २,९८५ कोटी, तर बांधकाम करातून २,३४१ कोटी

SCROLL FOR NEXT