Judicial punishment for Police inspector in bribe case
Judicial punishment for Police inspector in bribe case 
पश्चिम महाराष्ट्र

69 हजार रुपयांच्या लाचप्रकरणी पोलिस निरीक्षकाला सक्तमजुरीची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी 69 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणात मोहोळ पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे यास आज मंगळवारी जिल्हा न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. 

कोणत्याही क्षणी गोड बातमी मिळेल - सुधीर मुनगंटीवार

गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी पोलिस निरीक्षक विश्वास साळोखे याने 85 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर 69 हजार रुपये घेण्याचे ठरले. पोलिस ठाण्यामध्ये 69 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलिस निरीक्षक साळोखे यास रंगेहात पकडले होते. ही घटना 9 जून 2016 रोजी घडली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास करून पोलिस निरीक्षक साळोखे याच्याविरोधात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. मंगळवारी या प्रकरणात न्यायालय यांनी पोलिस निरीक्षक साळोखे यास चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी दिली.

रणनिती तयार; आमदार फुटण्याचे धाडस करणार नाहीत : थोरात

साळोखे हे सध्या पंढरपूरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पोलीस चौकीत कार्यरत होते. तीन वर्षांपूर्वी मोहोळ पोलिस ठाण्यात कार्यरत असताना लाच प्रकरणात अटक झाली होती. पंढरपुरात आमदार भारत भालके यांच्याशी झालेला वादामुळे विश्वास साळोखे हे चर्चेत आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Yoga Tips : उत्तम पचनक्षमतेसाठी योगा फायदेशीर, जेवण झाल्यावर करा ‘या’ योगासनांचा सराव

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

SCROLL FOR NEXT