crop insurance 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापुरात ज्वारीचा विमा हप्ता भरा 30 नोव्हेंबरपर्यंत 

संतोष सिरसट

सोलापूर : रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना शासनाने आज जाहीर केली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना ज्वारीच्या विम्याचा हप्ता भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्या मुदतीत विमा भरण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. या योजनेअंतर्गत जोखिमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के असा निश्‍चित करण्यात आला आहे. या योजनेत गहू (बागायत व जिरायत), ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, उन्हाळी भात, करडई, सूर्यफूल, उन्हाळी भुईमूग व रब्बी कांदा या पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील केवळ ज्वारी या पिकाचा विमा हप्ता 30 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार आहे. उर्वरित पिकांसाठी हप्ता भरण्याचा कालावधी 31 डिसेंबरपर्यंत आहे.

उन्हाळी भुईमुगासाठी एक एप्रिलपर्यंत विमा हप्ता भरता येणार आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी बजाज अलियांन्झ जनरल इंशुरन्स कंपनी असेल. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apple चा मोठा निर्णय! एका ग्राहकाला दोनपेक्षा जास्त iPhone खरेदी करता येणार नाहीत; भारत आणि अमेरिकेत नियम लागू

नवी कोरी गाडी, शोरूममधून बाहेर काढताना अचानक स्पीड वाढलं; रस्त्यावर दुचाकीला उडवलं, CCTV VIDEO VIRAL

Kidney Cancer Symptoms : लघवीतून रक्त येतंय, सतत थकवा जाणवतोय? 'ही' असू शकतात 'किडनी कॅन्सर'ची लक्षणे; दुर्लक्ष करुन नका, अन्यथा...

Latest Marathi News Live Update : चंद्रभागा वाळवंटात स्वच्छता अभियान, नगरपालिका आणि वारकऱ्यांचा पुढाकार

अंकुश चौधरीचा लेक दिसतो तरी कसा? दीपा परबने शेअर केला खास फोटो, म्हणाली…

SCROLL FOR NEXT