K Chandrashekar Rao Sakal
पश्चिम महाराष्ट्र

K Chandrashekar Rao : महाराष्ट्र सरकारने डोळे उघडावे आणि अण्णा भाऊ यांना भारतरत्न द्यावे, KCR करणार शिफारस

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जाहीर सभेत बोलत होते.

पोपट पाटील, विजय लोहार

इस्लामपूर/नेर्ले - महाराष्ट्र सरकारने आतातरी डोळे उघडावे. अण्णा भाऊ साठे याना आजपर्यंत सरकारने वंचित ठेवले.हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही.अण्णाभाऊ साठे यांनी कायम शोषित आणि वंचित माणसांचे लेखन केलं. भारताच्या दृष्टीने ते मॅक्सीन गोरकी आहेत असं रुस ने म्हणले आहे.

या पावन धरतीला नम्र पणे मी प्रणाम करतो.अण्णा भाऊ साठे यांचे हे साहित्य देशभरातील विविध भाषांमध्ये प्रकाशित व्हावं असे मत तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री भारत राष्ट्र समितीचे संस्थापक के.चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केले.

ते लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे जन्मभूमी जयंती महोत्सव वाटेगाव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जाहीर सभेत बोलत होते.

यावेळी अण्णा भाऊ साठे यांच्या सून सावित्रीमाई साठे,ह्या अध्यक्षस्थानी होत्या.अण्णा भाऊ यांचे नातू सचिन साठे,शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील,योगेश साठे,रवींद्र बर्डे,देवराज पाटील,बी जी पाटील,मनोहर गायकवाड,उपस्थित होते.

यावेळी के.चंद्रशेखर राव म्हणाले," अण्णाभाऊ साठे हे कधीच मागे हटले नाहीत रशिया सरकारनं अण्णाभाऊंचा सन्मान केला. पण महाराष्ट्र सरकार व भारताने त्यांचा सन्मान केला नाही. गाजलेले व्यक्तिमत्व झाकण्याचं काम करण्यात आलं संपूर्ण हिंदुस्थानामध्ये विविध भाषेमध्ये अण्णाभाऊंचे साहित्य प्रकाशित करायला हवं.

यासाठी मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रव्यवहार करेन. तेलंगणा सरकार अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळवण्यासाठी शिफारस करेल त्याच पद्धतीने शिंदे सरकारने देखील अण्णाभाऊ साठे भारतरत्न मिळण्यासाठी शिफारस करावी.

मातंग समाजाला आमदार,खासदार अशा जागा उपलब्द करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले".अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे,म्हणाले,"के. सी. आर यांच्या पाठीशी संपूर्ण समाज उभा राहील.

अण्णा भाऊ साठे यांना भारत रत्न मिळावा.मातंग समाजाला राजकीय स्थान मिळावे.समाजाची एकजूट हवी.अनेक लोकांना जवळून बघितले.पण अण्णा भाऊ यांना वंचित ठेवले.प्रा शरद गायकवाड म्हणाले,"आत्मा,स्वर्ग,

माजी खासदार हरिभाऊ राठोड म्हणाले,"

भारत राष्ट्र समितीचे सांगली जिल्हा समनव्यक बी जी पाटील म्हणाले,"क्रांतिकारकांनी हे राष्ट्र शहीद होऊन आमच्या हाती दिलं. स्वातंत्र्य कुठे आहे? आत्महत्यांचं राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख होऊ पाहत आहे.सामान्य माणसांच्या जगण्यावर बोला. तेलंगणामध्ये वीस लाख एकर पाणी पुरवलं.अजूनही सुरुल,ओझर्डे चे पाणी मिळाले नाही.

कुठे वाकुर्डे बुद्रुक चे पाणी? कुठे गेले भाऊ? कुठे आहेत साहेब? शेतकरी समोर ठेऊन काम करायला हवे.वाईट विचार तुडवायचे आहेत.

तेलंगणामध्ये सगळं काही मोफत आहे.सांगली जिल्हा माजी आरोग्य सभापती रवींद्र बर्डे म्हणाले," रंजलेल्या गाजलेल्या लोकांचं दुःख अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यात मांडल्या वाटेगाव च नाव जगात अजरामर झाले आहे.समाजाला प्रेरणा दिली.रूपकात्मक लेखन केले".

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील,प्रकाश पाटील,संदीप पाटोळे,अनुसूचित जाती मोर्चाचे पंडित सुर्यवंशी,डॉ.अंकुश,आठवले गटाच्या रुपाली वायदंडे,माजी सरपंच सुरेश साठे,नंदाताई चौगले,सुवर्णा पाटील,सुवर्णा जाधव,राजीव बर्डे,बिजी देशमुख, भगीरथ भालके,अजीर मौलाना,यांची उपस्थिती होती.

के चंद्रशेखर आल्यानंतर ये आझादी झुटी है देश की जनता भुकी है!जय लहुजी,जय अण्णा भाऊ,जय भीम,च्या घोषनांनी परिसर दुमदुमला.

अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा व विविध भाषांमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य प्रकाशित करावं असे दोन ठराव जाहीर सभेमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांनी मांडले. यावेळी उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून या ठरावाला संमती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT