कडेगाव (जि. सांगली) : गेल्या नऊ दिवसांत तालुक्यातील देवराष्ट्रे येथे शीर धडावेगळे करुन निर्घृण खून व एकतर्फी प्रेमातून तलवार हल्ला तसेच शिवाजीनगर येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आदी समाजमन सुन्न करणाऱ्या घटनांनी तालुका अक्षरशः हादरुन गेला आहे.या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन दोषींना कठोरात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे.
कडेगाव तालुक्याचा क्राईम रेट हा कायमच कमी राहिला आहे. त्यामुळे शांतताप्रिय तालुका अशीच तालुक्याची ओळख आहे.परंतु तालुक्यातील देवराष्ट्रे येथे एका सव्वीस वर्षीय सागर होनमाने या प्रेमवीराने एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीवर व तिच्या आईवर तलवारीने हल्ला करुन अनेक वार करुन गंभीर जखमी केले. हे प्रकरण शांत होते न होते तोपर्यंत सात दिवसांत याच गावांत अनैतिक संबंधाच्या संशयातून लक्ष्मण निवृत्ती मुढे याने धारदार कुराडीने जयसिंग जमदाडे यांचे शीर धडावेगळे केले. एवढ्यावरच हल्लेखोर मुढे हा थांबला नाही तर त्याने जयसिंग यांचे शीर त्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडामध्ये टाकले. अशा रीतीने निर्घृण खून करुन तो तेथून पसार झाला. या खून प्रकरणाने तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
देवराष्ट्रेतील या निर्घृण खून प्रकरणाचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच शिवाजीनगर येथे काल शुक्रवारी दोन वृद्धाकडून बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर धमकी देवून वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकमेकांचे सख्खे भाऊ असलेल्या दोघा वृद्धांकडून बारावर्षीय अल्पवयीन मुलीवर केलेला बलात्कार ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना असल्याने शिवाजीनगरसह संपुर्ण तालुक्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
अशा रीतीने तालुक्यात गेल्या नऊ दिवसात घडलेल्या या तीन घटनांनी तालुक्याच्या शांतताप्रिय अशी ओळखीला निश्चितच तडा गेला आहे.त्याचबरोबर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबतीतही सर्वसामान्यांच्या मनामध्ये आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तेव्हा या तिन्ही घटनातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी तालुक्यातील तमाम नागरिकांतून मागणी होत आहे.
बघ्याची भूमिका खेदजनक
तालुक्यातील देवराष्ट्रे येथे शीर धडावेगळे करुन एकाचा निर्घृण खून व एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलगी व तिच्या आईवर तलवार हल्ला,तसेच शिवाजीनगर येथील अल्पवयीन मुलीवर दोन वृद्धांचा बलात्कार आदी गंभीर गुन्हेगारी घटनांचे सत्र तालुक्यात सुरु असताना येथील सत्ताधारी,विरोधीपक्ष व विविध संघटनांनी घेतलेली बघ्याची भूमिका ही खेदजनक असल्याचे बोलले जात आहे.तर त्यांनी तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित कशी राहील यासाठी पोलीस प्रशासनातर्फे प्रयत्न करणे गरजेचे होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.