kannada association activists down for tanaji film poster in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी "तानाजी' चे पोस्टर उतरविले

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : विविध कारणांनी सीमाभागातील मराठी भाषिकांना त्रास देणाऱ्या कन्नड संघटनांनी आता चित्रपटांना लक्ष करण्यास सुरवात केली आहे. शुक्रवारी बेळगाव व इतर भागातील चित्रपट गृहात जाऊन तानाजी चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच तानाजी चित्रपटाचे पोस्टर फाडून त्याला आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे सीमावासीयांमधून तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ग्लोब टॉकीज येथे आलेल्या कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाचे पोस्टर काढा आणि चित्रपट बंद करा अशा घोषणा देत चित्रपट गृहातील कर्मचारी वर्गावर दादागिरी केली. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ माजला होता. बेळगावसह धारवाड, दावनगिरी येथेही चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडण्याचा प्रयत्न कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

हे पण वाचा -  पहिल्याच प्रयत्नात बेळगावची मुलगी भारतीय वनसेवेत... 


काही दिवसांपूर्वी कनसे या कन्नड संघटनेच्या म्होरक्‍या भीमाशंकर याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना गोळ्या घाला असे वक्तव्य केले होते. याबाबत सीमाभागासह महाराष्ट्रात तिव्र प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या. तसेच शिवसेनेने भीमाशंकर याचा पुतळा जाळून कन्नड संघटनांचा निषेध नोंदविला होता. याचबरोबर कोल्हापूर येथे कन्नड चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडण्यात आले होते. त्यामुळे कन्नड संघटनांनी तानाजी चित्रपटात महाराष्ट्राचा इतिहास असल्याचे सांगत चित्रपटाचे प्रदर्शन बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. कन्नड संघटनेच्या धमकीमुळे ग्लोब टॉकीजवरील पोस्टर खाली उतरविण्यात आले आहे. कन्नड संघटनेच्या दादागिरीचा महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जाहीर निषेध करण्यात आला आहे.

हे पण वाचा - पोटच्या मुलींना तळ्यात फेकून मातेने ही घेतली तळ्यात उडी...

बेळगाव आणि सिमाभागात कन्नड संघटनांची दादागिरी वाढत असून मराठी भाषिकांना त्रास देणाऱ्या संघटनांना पोलिस पाठीशी घालत आहेत. तानाजी चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचा इतिहास मांडण्यात आलेला आहे. अशा चित्रपटाला विरोध करून कन्नड संघटनांनी विरोध करून आपली लायकी दाखवून दिली आहे. असे मत मराठी भाषिकांमधून व्यक्त होत असून हिंदुत्ववादी पक्ष व संघटना याबाबत काय करणार? असा प्रश्नही विचारला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अमित शाहांसोबत कॅप्टन खरातचा फोटो व्हायरल; काँग्रेसने उपस्थित केला गंभीर प्रश्न

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्या निम्मित कांजूरमार्गमध्ये संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने अनोखे प्रदर्शन

राज्यात मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

Captain Kharat: कॅप्टन खरातचं भलतंच प्रकरण उघडकीस; महिलेचे AI फोटो अन् १८ फेब्रुवारीला गुन्हा...

SCROLL FOR NEXT