Kanwad-Mhaisal Dam esakal
पश्चिम महाराष्ट्र

Mhaisal Yojana : कृष्णा नदीवर कनवाड-म्हैसाळदरम्यान उभारण्यात येणार धरण; शिरोळसह सांगली जिल्ह्याला मोठा दिलासा

शिरोळ (Shirol) तालुक्यात कृष्णा, वारणा, पंचगंगा व दूधगंगा अशा चार नद्या असल्याने तालुक्याला बारमाही पाणी उपलब्ध असते.

सकाळ डिजिटल टीम

कनवाड-म्हैसाळदरम्यानच्या धरणामुळे एक हजारहून अधिक दशलक्ष घनफुटापर्यंत पाण्याची पातळी राहणार आहे. त्यामुळे शिरोळ, सांगलीसह दुष्काळी तालुक्यांनाही या धरणाचा फायदा होणार आहे.

जयसिंगपूर : शिरोळ (Shirol) तालुक्यात कृष्णा, वारणा, पंचगंगा व दूधगंगा अशा चार नद्या असल्याने तालुक्याला बारमाही पाणी उपलब्ध असते. अशातच म्हैसाळ योजनेच्या उपशासाठी कृष्णा नदीवर (Krishna River) कनवाड-म्हैसाळदरम्यान धरण उभारण्यात येणार आहे. यासाठी १८६ कोटींची तरतूद केली आहे.

हे धरण हिप्परगी (ता. जमखंडी) येथील धरणाप्रमाणे (Hippargi Dam) होणार आहे. त्यामुळे अर्जुनवाड, उदगाव, कोथळी, सांगली, डिग्रज अशा २८ किलोमीटरपर्यंत भविष्यातही पाण्याची कमतरता भासणार नाही. कृष्णा नदी कोल्हापूर-सांगली जिल्ह्याची सीमा आहे. कृष्णेवर सध्या कनवाड (ता. शिरोळ) ते म्हैसाळ (ता. मिरज) दरम्यान कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे.

म्हैसाळ येथे दुष्काळी भागात पाणी पोहोचविणारी योजना (Mhaisal Yojana) असून, याद्वारे जत, कवठेमहांकाळ, सांगोला यासह अन्य भागाला पाणी दिले जाते. त्यामुळे म्हैसाळ येथून पाण्याचा उपसा केला जातो. शिवाय म्हैसाळ योजनेद्वारे दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी १७.४४ टीएमसी पाणी उचलण्यास मंजुरी आहे. सध्या म्हैसाळ-कनवाड बंधाऱ्‍याची क्षमता ३७१ दशलक्ष घनफूट आहे.

कृष्णा नदीचे पाणी कमी झाल्यास म्हैसाळ योजनेला उपसा करता येत नाही. त्यामुळे म्हैसाळ बंधाऱ्याची क्षमता वाढवणे हे सरकारच्या विचाराधीन होते. यासाठी पाटबंधारे विभागाकडून यासाठी निधी मंजूर झाला होता. त्यातूनच १४६ कोटी ६० लाख ६४ हजार रुपये या धरणासाठी रक्कम निश्चित केली होती. या धरणाला सोळा गेट असणार असून, कोणत्याही शेतकऱ्‍याची जमीन संपादित करावी लागणार नाही.

पाणीपातळीत होणार वाढ

कनवाड-म्हैसाळदरम्यानच्या धरणामुळे एक हजारहून अधिक दशलक्ष घनफुटापर्यंत पाण्याची पातळी राहणार आहे. त्यामुळे शिरोळ, सांगलीसह दुष्काळी तालुक्यांनाही या धरणाचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर राजापूर बंधा‍ऱ्यापुढील असणाऱ्‍या कर्नाटकातील चाळीसहून अधिक गावांना भीषण टंचाईला सामोरे जावे लागते. हे धरण झाल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या धोरणानुसार सीमाभागापर्यत मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT