पश्चिम महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी गाई, म्हशीवाटप योजना 

सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड - दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पशुपालनातून स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, त्यांनी आत्महत्यासारख्या वाईट घटनेकडे वळू नये यासाठी दोन देशी किंवा संकरित गाई, दोन म्हशींचा गट व २० शेळ्या व दोन बोकड गट वाटप योजना राज्यातील सहा जिल्ह्यांत राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. त्यात सातारा जिल्ह्याचा समावेश असून, त्या योजनेला नुकतीच पशुसंवर्धन विभागाने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात ही योजना सातारा, उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात, तर दुसऱ्या टप्प्यात बीड व भंडारा या दोन जिल्ह्यात राबविली जाणार आहे.

दुष्काळी स्थिती, नापिकीमुळे कर्जबाजारी होऊन दुष्काळी भागातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना आत्महत्येसारख्या वाईट घटनेपासून दूर ठेवण्यासाठी काही उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी व त्यांना त्यातून स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी गाई, म्हशी व शेळ्या वाटप योजनेस मंजुरी दिली आहे.

शेतकऱ्यांना दोन संकरित गाईंसाठी ५६ हजार, म्हशींसाठी ६६ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. शेळी गटासाठी एक लाख १४ हजार ७०० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. अनुदान सहा महिन्यांच्या दोन टप्प्यात २५-२५ टक्के असे दिले जाणार आहे. तेही संबंधित लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. योजनेत सहभागी झालेल्या लाभार्थ्यांना तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यात त्यांना देशी, संकरित, दुधाळ जनावरांच्या जाती, म्हशींच्या जाती, त्यांचे संगोपन, निवारा, आहार, माज ओळखणे, कृत्रिम रेतनाचे महत्त्व, त्याची वेळ, लसीकरण, वासरांचे संगोपन, आहार, वैरणीच्या जाती आदींची माहिती दिली जाणार आहे. जनावरे खरेदी करताना त्यांचा विमाही उतरवण्यात येणार आहे.  

...अशी होईल लाभार्थी निवड 
या योजनेंतर्गत लाभार्थी निवड करताना त्यांच्याकडे चारा उत्पादनाबरोबरच बंदिस्त आणि मुक्त गोठा पद्धतीसाठी स्वतःची पुरेशी जमीन उपलब्ध असणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर छोटे कुटुंब संकल्पनेवर आधारित लाभार्थ्याची निवड केली जाणार आहे. संबंधित योजनेशी संलग्न योजनेचा लाभ घेतला असेल, असा लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहणार नाही. या योजनेसाठी पंचायत समितीतील पशुधन विकास अधिकाऱ्याकडे अर्ज करायचा आहे. लाभार्थी निवडीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन केली जाणार आहे. जनावरे खरेदीसाठी पंचायत समितीतील पशुधन विकास अधिकाऱ्यांची निवड केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; चेन्नईची मदार जडेजावरच

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT