पश्चिम महाराष्ट्र

वृक्षारोपनाची नोंदणी आता ऑनलाइन! 

सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड - दर वर्षी अनेक ठिकाणी खड्डे तेच आणि झाडे नवीन अशी प्रचिती शासनाच्या विविध विभागात येते. त्यावर उपाय म्हणून आता शासनाने यावर्षी जिल्हा परिषद शाळांमध्ये झाडे लावण्यासाठी खोदलेले खड्डे आणि लावलेली झाड याची माहिती ऑनलाइन भरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे शाळांवर आता बंधन येणार आहे. मात्र, अनेक शाळांपुढे यापूर्वी झाडे लावल्याने जागाच उपलब्ध नसल्याने झाडे लावायची कोठे अशी सद्यस्थिती आहे. 

पर्यावरणाचा बिघडलेला समतोल सावरण्यासाठी शासन दर वर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करते. त्याअंतर्गत दर वर्षी लाखो रोपे लावलीही जातात. मात्र, त्यांचे संगोपन होत नाही. त्यामुळे अनेक रोपे वाया जातात हे शासनानेच केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. त्याचबरोबर शासनाने ही रोपे मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावी, यासाठी रोपवाटिकाही ग्रामपंचायतींच्या व खासगी व्यक्तींच्या माध्यमातून सुरू केल्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन झाले. मात्र, ती झाडे जगली, की नाही याची खातरजमा केली जात नाही. त्याचबरोबर अनेकदा मागील वर्षाच्या खड्यातच नवीन झाडे लावली जातात हेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यावर बंधन आणण्यासाठी शासनाने आता शाळांमध्ये होणाऱ्या वृक्षारोपनात पारदर्शकता आणण्यासाठी झाडांसाठी काढलेल्या खड्यांपासून वृक्षारोपनाची माहिती ऑनलाइन भरण्यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांत राबवण्यात आलेल्या वृक्षारोपनाच्या मोहिमेमुळे अनेक शाळांतही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या अनेक शाळांत झाडे लावण्यासाठी जागाच उपलब्ध नाही, अशी स्थिती आहे. मात्र, शासनाने तर शाळांना झाडे लावणे बंधनकारक करून त्याची माहिती ऑनलाइन भरणेही बंधनकारक केले आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर जागेचा यक्ष प्रश्न आहे. 

जागेचा सर्व्हे आवश्‍यक  
जिल्हा परिषद शाळांमध्ये यापूर्वी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शाळांतील वृक्षारोपनासाठीची जागाच संपल्याने नवीन वृक्षारोपन करायचे कोठे हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी शाळांकडे जागा किती उपलब्ध आहे याचा सर्व्हे करून त्यांना वृक्षारोपनाची माहिती ऑनलाइन भरणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT