Karad Became HOTSPOT 
पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाडला धोका कायम : म्हासोलीत कोरोनाचा रूग्ण आढळला

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड  : कऱ्हाड तालुक्यात तब्बल पाच दिवसानंतर आज (शनिवारी) कोरोनाचा एक नवीन रुग्ण सापडल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरुन स्पष्ट झाले. संबंधित बाधीत हा तालुक्यातील म्हासोली (ता. कऱ्हाड) येथील असुन तो देहु-आळंदी वरुन काही दिवसापुर्वी गावी आला होता. त्यामुळे तालुक्याची कोरोनाबाधितांची संख्या एकने वाढुन ९१ झाली आहे.

कोरोनासाठी हॉटस्पॉट बनलेल्या कऱ्हाड तालुक्यात सोमवार (ता. ११) पासुन कोरोना बाधीतांची संख्या कमी झाली होती. पाच दिवसात एकही बाधीत सापडला नव्हता. त्यामुळे तालुक्यातील बाधीतांची संख्या रोखण्यात आरोग्य यंत्रणेला आणि प्रशासनाला यश आले होते.

दरम्यान आज (शनिवारी) पाच दिवसानंतर  तालुक्यातील उंडाळे विभागातील म्हासोली येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे आरोग्य विभागच्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे.त्यामुळे तालुक्यात नव्याने या रुग्णाची भर पडली आहे.  कऱ्हाड तालुक्याची संख्या एकने वाढुन ती ९१ झाली आहे. दरम्यान संबंधित गावात आज तालुका पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.
संगिता देशमुख, मंडल अधिकारी नागेश निकम, येवती आरोग्य केंद्राचे पथक दाखल झाले आहे.

त्यांनी संबंधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्याची कार्यवाही सुरु केली आहे. पोलिसांनी संबंधित गावातील येण्या-जाण्याचे रस्ते बंद केले आहेत. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याची कार्यवाही सुरु केली आहे.

तर दुसरीकडे क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 29, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 24, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील दोन व ग्रामीण रुग्णालय वाई येथील नऊ तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणी करण्यात आलेल्या 10 संशयितांचे नमुने निगेटिव्ह आले असून एकूण 74 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, असे बी. जे. वैद्य'कीय महाविद्यालय पुणे यांनी कळविले आहे.

रात्री उशिरा क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे 40, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 64 असे एकूण 104 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : नगर-श्रीगोंदा मार्गांवर तेल वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT