Karad-Tasgaon road in poor condition for three years 
पश्चिम महाराष्ट्र

कराड-तासगाव रस्त्याची तीन वर्षापासून दुरवस्था 

संजय गणेशकर

पलूस : विजापूर-गुहागर मार्गावरील कराड-तासगाव रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षापासून रखडले आहे. सध्या या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. केंद्रीय महामार्ग समितीचे या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष आहे. या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी होत आहे. 

विजापूर-गुहागर मार्गाचे काम तीन वर्षापूर्वी सुरू करण्यात आले. पलूस तालुक्‍यातील घोगांवपासून ते पाचवा मैलपर्यंत हे काम विविध ठिकाणी सुरू झाले. अगोदर रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे तोडण्यात आली. त्यानंतर रस्ता रुंदीकरण करण्यासाठी रस्त्याच्या बाजूचे शेतकरी आणि महामार्ग समिती यांचेमध्ये वाद निर्माण झाला. हे प्रकरण न्यायालयात गेले. तोपर्यंत समितीने जागोजागी पुलांसाठी व रस्त्याच्या कामासाठी खोदाई केली. मात्र, हे कामही महामार्गाचे ठेकेदारांनी अर्धवट सोडून दिले. 

चालू रस्त्यावर झालेली खोदाई आणि उर्वरित रस्त्यावर असणारे खड्डे यामुळे गेल्या तीन वर्षांपासून या रस्त्यावरुन जाताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. सांगली, तासगाव, कोल्हापूर, मुंबई, कराड, सातारा, इस्लामपूर, पलूस व इतर शहरांकडे ये-जा करणारी हजारो वाहने आहेत. खराब रस्त्यामुळे दुप्पट-तिप्पट वेळ वाहणे चालवताना लागत आहे. रस्त्यावरील खड्डयामुळे गेल्या तीन वर्षांत अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. यामध्ये काही जणांचे प्राण गेले आहेत. काहींजण जखमी झाली आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या घरातील नागरिकांना धुळीचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत आहे. 

लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना व नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले. काही ठिकाणी डांबरीकरण करून मलमपट्टी करण्यात आली. मात्र, सध्या या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत. वाहने चालवले मुष्किल झाले आहे. राज्याचे सहकार राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सांगली येथे बैठकीत अधिकाऱ्यांना रस्त्याच्या कामाबद्दल सूचना केल्या आहेत. मात्र, अद्यापही रस्त्याच्या कामास सुरुवात झालेली नाही. महामार्ग समितीच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी होत आहे.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT