SHIVAJIRAO KARDILE 
पश्चिम महाराष्ट्र

कर्डिलेंनी सांगितली पराभवाची अंदर की बात.. त्याच्यामधे त्या ठिकाणी चमत्कार झाला

विलास कुलकर्णी

राहुरी : राहुरी-नगर मतदारसंघात पराभव झाल्याचे खापर माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर फोडले होते. त्यांचा रोख विखे पाटील पिता-पुत्रांवर होता. आता मात्र त्यांनी आपल्या पराभवाचे विश्लेषण जाहीररित्या केलं आहे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कशामुळं काय झालंय हे त्यांनी ताडलं आहे.

""राहुरी विधानसभा मतदारसंघात मोठी विकासकामे केली; परंतु निवडणुकीत त्याचे मूल्यमापन झाले नाही. प्रचाराच्या शेवटच्या रात्रीच्या चमत्काराला नमस्कार झाला. ज्यांनी तालुक्‍याचे वाटोळे केले, जे पंधरा वर्षे कोणाच्या सुखदुःखात नव्हते, ते लाटेत निवडून आले. मात्र, मी खचलेलो नाही. राजकीय वारसा नसताना पंचवीस वर्षे जनतेने मला भरभरून दिले. सहा महिने वाट पाहू. विकासकामांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत, तर रस्त्यावर उतरून संघर्ष करू,'' असे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगितले. 


राहुरी येथे भाजपच्या नवीन तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, आसाराम ढूस, सुभाष गायकवाड, रवींद्र म्हसे, सुखदेव ताठे, नमिता शेटे, राजेंद्र उंडे, गणेश खैरे, डॉ. संजय भळगट, उत्तम म्हसे, नयन शिंगी, साहेबराव म्हसे उपस्थित होते. 


कर्डिले म्हणाले, ""निवडणुकीतील पराभवात जनतेला दोष देत नाही. विकासकामांच्या आत्मविश्वासामुळे गाफील राहिलो. मी पराभवाने खचणारा नाही. राजकीय जीवनात अनेक संकटांना सामोरा गेलो. माझ्या जागेवर दुसरा लोकप्रतिनिधी असता, तर त्याने आत्महत्या केली असती. आमदार नसलो, तरी कार्यकर्त्यांच्या मागे खंबीर उभा राहीन.

माझ्या आजही जनता दरबार

माझ्या घरी आजही "जनता दरबार' भरतो. जनतेला माझ्या कामाची खात्री व विश्वास आहे. तालुका कार्यकारिणीची निवड करताना सर्व जातिधर्मांना प्रतिनिधित्व दिले. लग्नपत्रिकेपुरता पदाचा वापर न करता तळागाळातील जनतेच्या प्रश्नांसाठी पदाधिकाऱ्यांनी झटून काम करावे. गावोगावी शाखा स्थापन करून पक्षसंघटना बळकट करावी, असे कर्डिले म्हणाले.

""ब्राह्मणीसह पाच गावे पाणीयोजनेच्या कामाला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली. ही योजना मार्गी लागावी, अन्यथा संघर्ष केला जाईल. मुळा धरणाच्या उजव्या कालव्याचे आवर्तन चार दिवसांत सुरू करावे, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू,'' असा इशारा कर्डिले यांनी दिला. माजी नगरसेवक राजेंद्र उंडे यांनी आभार मानले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT