Karmaveer Bhaurao Patil Jayanti 2021: कर्मवीरांचे विद्यार्थी वसतिगृह व्यवस्थापन 
पश्चिम महाराष्ट्र

Karmaveer Bhaurao Patil Jayanti 2021: कर्मवीरांचे विद्यार्थी वसतिगृह व्यवस्थापन

प्रारंभी वसतिगृह सुरू करताना कर्मवीरांना खूप अडचणींना सामोरे जावे लागले. त्यावर त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या

सकाळ वृत्तसेवा

वसतिगृह सुरू करणे सोपे असते; मात्र ते सुरळीत चालवणे अवघड असते. वसतिगृहासाठी लागणाऱ्या वस्तू मोफत मिळत नसत. धान्य व भाजीपाला विकत आणावा लागे. त्या खर्चासाठी पैशांची आवश्‍यकता भासे. वसतिगृह सुरू केल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आधी स्वतःकडील खर्च घातला. पुढे वसतिगृह चालवताना त्यांनी समाजालाही सहभागी करून वसतिगृहांचे व्यवस्थापन उत्तम चालवले.

- पी. टी. पाटील, कोल्हापूर

प्रारंभी वसतिगृह सुरू करताना कर्मवीरांना खूप अडचणींना सामोरे जावे लागले. त्यावर त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यांनी त्यांच्याकडील सोन्याचे दागिने विकून त्यातून वसतिगृहाचा खर्च भागवण्यास हातभार लावला. पतीच्या शिक्षणाच्या कार्यात अडथळा येऊ नये यासाठी अंगावरील दागिनेही देऊ केले. पतीच्या कार्यात त्या पूर्णपणे समरस झाल्या. त्यांच्याकडील वसतिगृहांतील सर्व जाती-धर्मांच्या विद्यार्थ्यांच्या त्या माता बनल्या होत्या.

कर्मवीरांना शिक्षण प्रसारासाठी वारंवार फिरतीवर जावे लागे. असेच ते एकदा बाहेर गेले असता वसतिगृहातील सर्व धान्य संपले. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक दिवस उपाशी राहावे लागले. लक्ष्मीबाईंना हे समजल्यानंतर त्या अस्वस्थ झाल्या. आतापर्यंतच्या खर्चासाठी त्यांनी त्यांचे सर्व दागिने विकले होते. आता त्यांच्याकडे फक्त मंगळसूत्र शिल्लक राहिले होते. दुसरीकडे दुकानदाराची मागील उधारीही देणे होती. त्यामुळे तो उधार धान्य देण्यास तयार नव्हता. विद्यार्थी सेक्रेटरी आप्पालाल शेख त्यांच्याकडे गेला आणि सर्व वस्तुस्थिती सांगितली. त्यावर लक्ष्मीबाईंनी मंगळसूत्र काढले आणि कागदाच्या पुडीत बांधून शेखकडे दिले आणि म्हणाल्या, ‘‘बाळ, हे घेऊन जा. हे मोडून त्या पैशांतून धान्य आणून सर्व जण पोटभर जेवा. ’’ त्या पुडीत त्या माउलीचा सौभाग्यालंकार मंगळसूत्र आहे, हे समजल्यावर सर्व मुलांचे डोळे पाणावले. त्यावर लक्ष्मीबाई म्हणाल्या, ‘‘भाऊराव हेच माझे खरे सौभाग्य अलंकार आहेत. ’’ भाऊरावांना हे समजल्यानंतर ते म्हणाले, ‘‘माझी पत्नी अडाणी असूनही तिने स्वतः घेतलेला निर्णय कर्णालाही लाजविणारा आहे.’’

त्यानंतर भाऊरावांनी एक योजना आखली. गावातील घरांतील महिलांनी पहाटे दळण्यास सुरुवात केली की मूठभर धान्य वसतिगृहाने दिलेल्या पिशवीत ठेवण्याचे आवाहन केले. हे धान्य आठवडाभराने विद्यार्थ्यांनी गोळा करायचे. त्याला भाऊराव मुष्टीफंड म्हणत. त्यानंतर सुगीच्या हंगामात वसतिगृहातील विद्यार्थी व शिक्षक मळणीच्या ठिकाणी खळ्यावर जाऊन वसतिगृहासाठी धान्य गोळा करत. लोकही खुशीने धान्य देत. त्यानंतर भाऊरावांनी ‘बोर्डिंगला धान्य दान’ योजना राबविली. त्या माध्यमातून धान्य जमा करून विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था केली.

वसतिगृहाचा कारभार भाऊरावांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थीच पाहत. स्वयंपाकासाठी विद्यार्थ्यांचे गट पाडले जात. साधारणपणे दहा दिवसांनंतर प्रत्येक गटाला स्वयंपाक करावा लागे. त्या दिवशी सकाळी-संध्याकाळी भांडी घासणे, स्वयंपाक करणे, वाढणे, स्वच्छता करणे आदी कामे गटातील विद्यार्थ्यांना करावी लागत. शेतीची कामे विद्यार्थ्यांना गटवार वाटून दिली जात असत. त्यातून शिक्षणाबरोबर स्वावलंबनाचेही धडे दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल, थोड्याच वेळात विसर्जन, अनंत अंबानीही उपस्थित

मुंबईत गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी

Village Road Dispute : पाणंद रस्त्यावरून होणाऱ्या वादावर प्रशासनाचे महत्वाचे पाऊल, रस्त्यांचे 'बारसं' घालून अतिक्रमण निघणार

Latur Crime: उदगीरमध्ये अनैतिक संबंधातून ४५ वर्षीय तरुणाचा खून; दोन आरोपींवर गुन्हा दाखल

Ganesh Visarjan 2025 : लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप ! दुसऱ्या दिवशीही राज्यासह देशभरात विसर्जन मिरवणुकांचा उत्साह

SCROLL FOR NEXT