Voting-List sakal
पश्चिम महाराष्ट्र

Karnatak Election : व्होटर स्लीपवरील नावात चुकांचा भडीमार; प्रशासनाच्या कारभाराबद्दल नाराजी

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : राज्यात विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यामुळे प्रशासनातफे व्होटर स्लीपचे वितरण करण्यात आले होते. मात्र, स्लीपवर चुकांचा भडीमार असल्यामुळे प्रशासनाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

मतदानादिवशी निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेली स्लीप व कोणतेही ओळखपत्र घेऊन आपल्याला मतदान करावे लागते. यासाठी मतदानापूर्वी प्रशासनाकडून व्होटर स्लीपचे वितरण केले जाते. बेळगाव विधानसभा मतदार संघात अंगणवाडी कार्यकर्ते व अंगणवाडी कर्मचाऱ्याकडून स्लीपचे वितरण करण्यात आले.

मात्र, प्रत्येक स्लीपवर एखादी चुक आहेच. स्लीपवर तसेच मतदार ओळखपत्रात इंग्रजीत सतीश चे सथीश, तानाजी चे थानाजी आदी चुका नावांमध्ये चुका करण्यात आल्या आहेत. अनेक जण नाव वाचतांना अडखळत आहेत. व्होटर स्लीप इंग्रजी व कन्नडमध्येच होती.

ग्रामीण भागातील मतदारांना तहसीलदार कार्यालयामार्फत मतदान कार्ड दिले जाते. मतदानासाठी व्होटर स्लीपचे वितरण देखील त्यांच्याचमार्फत केले जाते. मतदान १० रोजी असल्याने चार दिवस आधीच व्होटर स्लीप पोहचल्या. व्होटर स्लीप स्विकारतांना अनेक जण अंगणवाडी कार्यकर्त्याना चुका असल्याचे दाखवून देत होते.

तरीही त्यांच्याकडून स्लीपचे वितरण करण्यात आले. प्रत्येक निवडणूकीवेळी व्होटर स्लीपवर चुका या असतातच. मात्र, त्यांच्याकडून नेहमीच दुर्लक्ष केले जाते. प्रशासनाने आधीच दखल घेऊन चुका टाळणे गरजेचे आहे. मतदान केंद्रावर अनेक जण मतदान करण्यासाठी जात होते. मात्र, अनेकांची नावे मतदान यादीतून गायबच झाली आहेत. त्यामुळे त्यांच्यातून नाराजी दिसून येत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT