Karnataka assessment completion examination
Karnataka assessment completion examination 
पश्चिम महाराष्ट्र

कर्नाटकात परीक्षा पूर्ण होण्यापूर्वीच मूल्यमापन होणार 

सकाळवृत्तसेवा

बेळगाव : लॉकडाउनमुळे बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर शिल्लक असला, तरी उर्वरित पेपरची तपासणी करण्याचा निर्णय पदवीपूर्व शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यामुळे पेपर तपासणीला लवकरच सुरुवात होणार आहे. सामाजिक अंतर राखण्यासाठी मूल्यमापन केंद्रावरील एका खोलीत केवळ 12 ते 15 प्राध्यापक मूल्यमापनाचे काम करणार आहेत. 

कोरोनाच्या संकटामुळे अद्याप बारावीची परीक्षा पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शेवटचा पेपर झाल्यानंतर मूल्यमापनाचे काम हाती घेण्यात येणार होते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता लवकर इंग्रजीचा पेपर घेणे शक्‍य होणार नाही. याची दखल घेत निकाल जाहीर होण्यास अधिक विलंब होऊ नये यासाठी परीक्षा पूर्ण होण्यापूर्वीच मूल्यमापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी राज्यातील 54 केंद्रावर मूल्यमापन केले जाते. मात्र यावेळी किती केंद्रांवर मूल्यमापन करावे याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र कोरोनामुळे सर्व शैक्षणिक जिल्ह्यांमध्ये मूल्यमापन करावे. त्यामुळे मूल्यमापकांना ये-जा करणे सुलभ होईल, अशी मागणी राज्य पदवीपूर्व प्राध्यापक संघातर्फे करण्यात आली आहे. 

यंदा राज्यातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या 6 लाख 80 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. यामध्ये कन्नड, अर्थशास्त्र, वाणिज्य व इतिहास विषयाच्या उत्तरपत्रिकांची संख्या 4 लाखांहून अधिक असून 21 हजार मूल्यमापकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच 20 दिवसांत मूल्यमापनाचे काम पूर्ण केले जाणार आहे. मात्र दरवर्षीपेक्षा यंदा मूल्यमापनाचे काम सामाजिक अंतर राखण्यासह आरोग्याची काळजी घेऊन 
करावे लागणार आहे. 

ल्यमापनाचे काम हाती 

मूल्यमापन करताना सामाजिक अंतर राखणे आवश्‍यक आहे. त्यामुळे मूल्यमापनाचा निर्णय घेताना सर्व गोष्टींचा विचार होणे आवश्‍यक आहे. शेवटचा पेपर लवकर घेऊन एकाचवेळी मूल्यमापनाचे काम हाती घेणे योग्य होणार असल्याचे सरकारी पदवीपूर्व महाविद्यालय, वडगावच्या प्रा. छाया पाटील-मोरे यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT