kognoli check post Esakal
पश्चिम महाराष्ट्र

कर्नाटकात प्रवेश करताय तर.. RTPCR बंधनकारक; तपासणी नाक्यावर बंदोबस्त

आरटीपीसीआर रिपोर्ट सक्ती : प्रवाशी परत महाराष्ट्रात

सकाळ वृत्तसेवा

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर कोगनोळी जवळ (Kognoli Check Post)असणाऱ्या दूधगंगा नदीवर कर्नाटक (Karnatka) सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त पुन्हा कडक करण्यात आला आहे. महाराष्ट्र व इतर राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांच्याकडे आरटीपीसीआर (RTPCR) रिपोर्टची मागणी करण्यात येत आहे. ज्या प्रवाशांच्याकडे आरटीपीसीआर रिपोर्ट नाही अशा प्रवाशांना परत महाराष्ट्रात (Maharashtra) पाठवून देण्यात येत आहे.

गेल्या आठ दिवसांमध्ये महाराष्ट्रात वाढत असलेले रुग्ण संख्येच्या पार्श्‍वभूमीवर येथील कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. रविवार (ता.२) रोजी सकाळपासूनच या ठिकाणी बंदोबस्त कडक करून हा रिपोर्ट नसणाऱ्या प्रवाशांना परत महाराष्ट्रात पाठवून देण्यात येत आहे. महाराष्ट्र व इतर राज्यातून येणाऱ्या बस व अन्य वाहनातून येणाऱ्या प्रवाशांचे कोगनोळी फाट्यावर तपासणी करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्येमुळे कर्नाटक शासनाने कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त वाढवला असून महाराष्ट्र लगत असणाऱ्या गडहिंग्लज, आजरा, चंदगड, उत्तूर या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना कागदपत्रांची तपासणी होत आहे.

निपाणी मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, कोगनोळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक एस ए टोलगी, राजू गोरखनावर यांच्यासह अन्य पोलीस, आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT