agriculture sakal
पश्चिम महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या विकासासाठी कर्नाटक राबविणार 'महाराष्ट्र पॅटर्न'

शेती उत्पादन वाढ आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी कर्नाटकाने 'महाराष्ट्र पॅटर्न' राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

विनायक जाधव

शेती उत्पादन वाढ आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी कर्नाटकाने 'महाराष्ट्र पॅटर्न' राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

बेळगाव - शेती उत्पादन वाढ आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी कर्नाटकाने 'महाराष्ट्र पॅटर्न' राबविण्याचा निर्णय घेतला आहे.‌ याबाबत कर्नाटकाचे कृषिमंत्री बी. सी. पाटील हे मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.

कृषिमंत्री श्री. पाटील यांनी नुकतीच मुंबईला भेट देऊन महाराष्ट्रातील शेती संबंधित योजनांची माहिती तेथील अधिकारीकडून घेतली होती. याबाबतचा एक सविस्तर अहवाल तयार करण्यात आला असून यात प्रामुख्याने प्रत्येक ग्रामपंचायतीला एक प्रमाणे महाराष्ट्राने सुरू केलेल्या ग्राम कृषी विकास समितीच्या धर्तीवर कर्नाटकात देखील ग्राम कृषी विकास समिती सुरू केली जाणार आहे. प्रत्येक समितीमध्ये बारा सदस्यांचा समावेश असणार आहे.

महाराष्ट्र शासनाने सर्व प्रगतशील शेतकऱ्यांच्या माहितीचा डेटाबेस तयार केला आहे. इतर शेतकरी या प्रगतशील शेतकऱ्यांशी संपर्क साधून शेती संबंधित माहिती घेऊ शकतात. यासह शेतकऱ्यांचे व्हाट्सअप ग्रुप देखील तयार करण्यात आले आहेत. हाच पॅटर्न कर्नाटकात देखील राबविला जाणार आहे. यासह शेती संबंधित सर्व योजनांमध्ये शेतकरी महिलांना ५० टक्के आरक्षण दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या योजना थेट मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात 'महाबीडीबी पोर्टल' सुरू करण्यात आली आहे. असे पोर्टल कर्नाटकात देखील सुरू केले जाणार आहे.‌

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: ''...म्हणून वाल्मिक कराडला जामीन नको'', उज्ज्वल निकम यांचा जोरदार युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Updates : माटुंगामध्ये विद्यार्थी बचावकार्याला सुरुवात

Flood Rescue: पुरात वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेण्यात अपयश; सोमवारी सकाळपासून पुन्हा सुरू होणार मोहीम

CPL 2025 : शाहरुखच्या संघातील फलंदाजाचे २० चेंडूंत ९२ धावांसह वादळी शतक; मोडला निकोलस पूरचा रेकॉर्ड

Nashik Ganeshotsav : बाप्पाच्या आरासीला 'चमकी'चा साज; गणेशोत्सवासाठी आकर्षक कापडांना नाशिकमध्ये मोठी मागणी

SCROLL FOR NEXT