karnatakas almatti dam storage 99 percent water discharge 70 thousand cusecs monsoon rain weather sakal
पश्चिम महाराष्ट्र

Almatti Dam : 'आलमट्टी'तून पुन्हा विसर्ग वाढवला; जलाशय उद्या भरण्याची शक्यता, धरणात 99 टक्के साठा

आलमट्टी जलाशयात आवक कायम राहिल्याने शनिवारी धरणातून विसर्ग वाढविण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

- रविंद्र मानगावे

चिक्कोडः आलमट्टी जलाशयात आवक कायम राहिल्याने शनिवारी धरणातून विसर्ग वाढविण्यात आला. शुक्रवारी 42 हजार क्युसेक असलेला विसर्ग शनिवारी संध्याकाळी 70 हजार क्युसेक ठेवण्यात आला आहे. जलाशयात 121.606 टीएमसी (98.80 टक्के) पाणीसाठा झाला आहे.

पावसाने उघडीप दिली तरी इतर नद्यांतून वाहून जाणारे पाणी आलमट्टीत कायम आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून हळुहळु कमी केलेला विसर्ग आज पुन्हा वाढविण्यात आला आहे. धरणात शनिवारी 82 हजार 438 क्युसेक पाणी येत होते. त्यामुळे शनिवारी संध्याकाळपर्यंत धरणात 121.606 टीएमसी पाणी साठा झाला आहे.

आलमट्टी जलाशयात शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 96 टक्के पाणी साठा झाला होता. 118 टीएमसीवरून शनिवारी तीन टीएमसी पाणीसाठा वाढून तो 98.80 टक्के झाला आहे. त्यामुळे रविवारी दुपारपर्यंत आलमट्टी जलाशय या हंगामात पूर्ण भरणार आहे.

गतवर्षी पाच ऑगस्ट रोजी आलमट्टीत 25 हजार क्युसेक आवक सुरू होती. त्यावेळी विसर्ग बंद केला होता. 5 ऑगस्ट 2022 रोजी धरणात 110 टीएमसी पाणीसाठा झाला होता. यंदा याच दिवशी त्यापेक्षा अधिक पाणी साठा झाला आहे.

त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी असले तरीही आलमट्टी जलाशय पूर्ण भरण्याच्या पातळीपर्यंत आले आहे. 519.60 मीटर पातळी असलेल्या आलमट्टीत इतका साठा झाल्यास 123.081 टीएमसी पाणी भरून पूर्ण क्षमतेने धरण भरले असे मानले जाते. शनिवारी धरणाची पातळी 519.52 मीटर इतकी आहे. त्यामुळे आता केवळ 0.08 मीटर पातळी वाढल्यास धरण पूर्ण भरणार आहे.

गतवर्षी पहिल्यांदा धरण भरून घेतल्यानंतर पुन्हा पाऊस सुरू होऊन पाण्याची आवक वाढली होती. त्यावेळी धरणातील साठा नियंत्रित करण्यासाठी मोठा विसर्ग करावा लागला होता. त्यामुळे आवक वाढल्याने गतवर्षी पहिल्यांदाच 2 लाखांवर क्युसेक विसर्ग करण्यात आला होता. धरणापलीकडे असलेल्या गावांना स्थलांतर करून गतवर्षी मोठा विसर्ग करण्यात आला होता. ऑगस्टच्या मध्यापर्यंत हा मोठा विसर्ग सुरू होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''भारत शांततेवर विश्वास ठेवतो, पण...''; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मूंचं देशवासीयांना संबोधन

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

Manchar News : ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा! मंचरला ‘टॉपकॉन ट्रायटन’ मशीनद्वारे रेटिना व सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे अचूक पद्धतीने होणार परीक्षण

Mangalwedha News : फार्मर आयडी असूनही पोर्टलवर दाखवत नसल्याने कर्जमाफी लटकली

SCROLL FOR NEXT