Kasegaon police caught the gang stealing a tractor trolley 
पश्चिम महाराष्ट्र

ट्रॅक्टर ट्रॉली चोरणाऱ्या टोळीला सांगलीत केले गजाआड

विजय लोहार

नेर्ले (सांगली)  : सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर ट्रॉली चोरणाऱ्या टोळीला कासेगाव पोलिसांनी गजाआड केले. संग्राम शिवाजी गायकवाड व अस्लम मेहबूब मोकाशी दोघेही (रा.रुकडी,ता हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून तब्बल ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल कासेगाव पोलिसांनी हस्तगत केला.कासेगाव पोलिसांच्या कारवाईमुळे तीन जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आठ गुन्हे केल्याची कबुली चोरट्यानी दिली.


कासेगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी

येवलेवाडी ता. वाळवा येथील रवींद्र भगवान जाधव यांनी स्वतःची ट्रॅक्टर ट्रॉली चोरीला गेली असल्याची फिर्याद २२ नोव्हेंबर रोजी कासेगाव पोलीस ठाण्यात दिली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी पथक तयार करून येवलेवाडी ते राष्ट्रीय महामार्गावरील,परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.

पोलिस कर्मचारी अमर जाधव यांना खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर चोरटे कोल्हापूर जिल्ह्यातील रुकडी येथील असल्याचे समजले.  संग्राम  गायकवाड व अस्लम मोकाशी यांना मुद्देमालासह पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता कासेगाव, कुरळप, शिराळा, इस्लामपूर, कोल्हापूर, कराड,करवीर,आष्टा, या भागात ट्रॅक्टर चोरल्याचे कबूल केले आहे. चोरट्यांकडून दोन ट्रॅक्टर, पाच ट्रॉली, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


 महामार्ग व ग्रामीण भागातील हॉटेल्स, पेट्रोल पंप, टोलनाके,दुकाने येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले.सांगली, कोल्हापूर,सातारा जिल्ह्यातील चोऱ्या या टोळीने केल्याचे उघड झाले.पोलीस कर्मचारी बी.एच. कुंभार ,जयकर सुतार, अमर जाधव, दीपक घस्ते, राहुल पाटील यांनी तपास केला.
शेतकऱ्यांच्या मेहनतीचे यांत्रिक वाहने चोरणाऱ्याना कासेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Live Update : साकीनाक्यात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT