Vishwajeet Kadam sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News : कवलापुरचे विमानतळ लवकर उभारले जावे - विश्वजीत कदम

कवलापूर विमानतळाचा गाजत असलेला मुद्दा आमदार विश्वजीत कदम यांनी आज विधिमंडळात उपस्थित केला.

सकाळ वृत्तसेवा

सांगली - कवलापूर विमानतळाचा गाजत असलेला मुद्दा आमदार विश्वजीत कदम यांनी आज विधिमंडळात उपस्थित केला. सांगली हा एकमेव जिल्हा विमानतळापासून वंचित आहे. कवलापूर येथे विमानतळासाठी १६० एकर जागा प्रस्तावित आहे. त्यासाठी वारंवार बैठका झाल्या.

मात्र त्याबाबत ठोस निर्णय झाला नाही. निर्यातीसाठी हे विमानतळ झाले तर त्याचा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला फायदा होऊ शकतो. त्यामुळे कवलापुरचे विमानतळ लवकर उभारले जावे असे प्रतिपादन आमदार कदम यांनी केले.

सकाळने कवलापूर विमानतळाच्या जागा विक्रीचा छुपा डाव उघडकीस आणल्यानंतर या विमानतळासाठी सांगलीतून विविध संस्थांनी पुढाकार घेत जनआंदोलन उभारले. या जागेवर विमानतळच व्हावे अशी आग्रही मागणी सांगलीकरांनी केली. त्या अनुषंगाने आज विधिमंडळ अधिवेशनात काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी शेती आणि औद्योगिक विषयावरील चर्चेत विमानतळाचा मुद्दा उपस्थित केला.

ते म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून विमानतळाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यासाठी वारंवार बैठका झाल्या. शासनाने येथे विमानतळ मंजूर केले आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही अलीकडच्या काळात याबाबत बैठक घेतली होती. ही दीडशे एकर ची जागा औद्योगिक वसाहतीसाठी देण्याची चर्चा सुरू होती.

मात्र पुन्हा एकदा बैठक होऊन तेथे विमानतळ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ती जमीन एअरपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया यांना हस्तांतरित करण्याचा निर्णय झालेला होता. पण नुसती चर्चा झाली, बैठका झाल्या मात्र ठोस कार्यवाही झालेली नाही.

ते म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकार दळणवळणाच्या मूलभूत सुविधांभर देत असताना उडान योजनेअंतर्गत देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये विमानतळ उभारली जात आहेत. मात्र आज सांगली हा एकमेव जिल्हा आहे, जो विमानतळाच्या सुविधेपासून वंचित राहिला आहे.

कवलापूरचे विमानतळ हे निर्यातीच्या बाबतीत जर होऊ शकले तर कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांना त्याचा फायदा होऊ शकतो असेही आमदार कदम यांनी सुचवत कवलापूर विमानतळ होण्याची गरज विधिमंडळात स्पष्ट केली. राज्य शासनाने तातडीने हे विमानतळ उभारण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विधानसभेत केली.

आमदार विश्वजित कदम म्हणाले, आज जिल्ह्याच्या आर्थिक औद्योगिक विकासामध्ये विमानतळाचे महत्त्व मोठे आहे. कवलापूर विमानतळ झाल्यास सांगली जिल्ह्यातील हळद, बेदाणे, द्राक्ष, डाळींब, भाजीपाला या शेतमालाला जगाची बाजारपेठ खुली होईल. जिल्ह्यातील शेती उद्योग व्यवसायाचे अर्थकारण बदलून जाईल. त्यामुळे हे विमानतळ होणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT