chandrashekhar rao esakal
पश्चिम महाराष्ट्र

KCR in Sangli: शेतकरी संघटनेचा ढाण्या वाघ BRS मध्ये, रघुनाथदादा पाटलांचा चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

के चंद्रशेखरराव हे तेलंगणामध्ये प्रत्येक शेतकर्‍याला पेरणीआधी एकरी दहा हजार रुपये देतात. शेतीसाठी मोफत वीज देवून शेतकर्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.

सकाळ डिजिटल टीम

इस्लामपूर- शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांच्या भारत राष्ट्र समिती या राजकीय पक्षात आज प्रवेश केला. साखराळे येथे रघुनाथदादा पाटील यांच्या घरी स्नेहभोजनानंतर झालेल्या चर्चेनंतर रघुनाथदादा यांनी के चंद्रशेखरराव यांच्या उपस्थितीत आम्ही त्यांच्या पक्षात प्रवेश करत असल्याचे घोषित केले. 9 ऑगस्टला क्रांतीदिनी इस्लामपूर येथे सुमारे 50 हजार शेतकर्‍यांचा मेळावा घेवून पक्षाची भुमिका स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

चंद्रशेखरराव म्हणाले, “ रघुनाथदादा हे राज्यातील तसेच देश पातळीवरील शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर लढणारे मोठे नेतृत्व आहे. ते आमच्या पक्षात आल्याने आमची ताकद वाढली आहे. इस्लामपूर येथे शेतकरी मेळावा घेवून आमची भुमिका स्पष्ट करु.“

रघुनाथदादा म्हणाले, “ राज्य व देश पातळीवरील भाजपचे सरकार हे लुटारुंचे सरकार आहे. आजवर त्यांनी शेतकर्‍यांच्याकडे दुर्लक्षच केले आहे. के चंद्रशेखरराव हे तेलंगणामध्ये प्रत्येक शेतकर्‍याला पेरणीआधी एकरी दहा हजार रुपये देतात. शेतीसाठी मोफत वीज देवून शेतकर्‍यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. आम्ही आजपर्यंत राज्यातील सरकारला अनेकवेळा शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाविषयी सांगून पाहिले, मात्र हे सरकार नालायक आहे, त्यांना शेतकर्‍यांशी देणेघेणे नाही. तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही शेतकर्‍यांचे भले व्हावे यासाठी आम्ही भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे. 9 ऑगस्टला इस्लामपूर येथे सुमारे 50 हजार शेतकर्‍यांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा घेवून या बाबतची भुमिका स्पष्ट केली जाईल.“

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT