kedar.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

केदार जाधव, राहुल त्रिपाठीसह नामवंत क्रिकेटर बारामतीत खेळणार

मिलिंद संगई

बारामती शहर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमला रणजी सामने खेळविण्यास बीसीसीआयने मान्यता दिल्यानंतर आता बारामतीकरांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा खेळ पाहायला मिळणार आहे. माजी रणजी खेळाडू व येथील अकादमीचे प्रमुख धीरज जाधव यांनी या बाबत माहिती दिली. 

सोमवारी (ता. 16) बारामतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमवर महाराष्ट्र बी विरुध्द महाराष्ट्र सी यांच्या प्रत्येकी पन्नास षटकांचा सामना खेळविला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तसेच आयपीएल खेळलेले केदार जाधव, राहुल त्रिपाठी, निखिल नाईक यांच्यासह महाराष्ट्र संघाचा कप्तान नौशाद शेख हे सोमवारी होणा-या सामन्यात खेळणार आहेत. 

सकाळी साडेनऊ वाजता हा सामना सुरु होणार असून बारामतीकरांना विनामूल्य हा सामना पाहता येणार आहे. बारामतीत प्रथमच प्रथम श्रेणी क्रिकेटमधील खेळाडूंचा खेळ पाहायला मिळणार असल्याने क्रीडा रसिकांनी याचा आनंद घ्यावा असे आवाहन धीरज जाधव यांनी केले आहे. रणजी निवड समितीचे अध्यक्ष मिलिंद गुंजाळ, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाज बागवान यांच्यासह प्रशिक्षक सुरेंद्र भावे व इतर मान्यवरही या सामन्यासाठी हजर राहणार आहेत. 

बारामतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमची खेळपट्टी सर्वोत्तम असून येथे सात विकेट असल्याने क्रिकेटसाठी ही जागा उत्तम असल्याचे मत स्वताः मिलिंद गुंजाळ यांनीच व्यक्त केले आहे. ग्रामीण भागातून क्रिकेटर घडावेत या उद्देशाने बारामतीत असे सामने होणे हे फायदेशीर असल्याचे मत क्रिकेटप्रेमी व्यक्त करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT