Keeping the village in the dark, the elected member! 
पश्चिम महाराष्ट्र

गावाला अंधारात ठेऊन यांनी निवडला सदस्य!

मार्तंड बुचुडे

पारनेर : गावाला अंधारात ठेवून ग्रामसेवक व तलाठ्याने ग्रामपंचायत पोटनिवडणुकीची एक जागा बिनविरोध केली, असा आरोप करत तालुक्‍यातील मांडवे खुर्द येथील सरपंचाने तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. 

मांडवे खुर्दच्या प्रभाग एकमधील एक जागा इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. या जागेवर मागील निवडणुकीत विजयी झालेल्या महिलेने जातीचा पुरावा वेळेत दाखल न केल्याने तिचे सदस्यत्व रद्द झाले. त्यामुळे तेथे पोटनिवडणूक जाहीर झाली होती. मात्र, हा निवडणूक कार्यक्रम गावाला माहीत झालाच नाही. ग्रामसेवक व तलाठी यांनी सरपंचासह ग्रामस्थांना याबाबत अंधारात ठेवले. कोणतीही माहिती दिली नाही. दरम्यान, निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ग्रामसेवक व तलाठ्याने गावातील काही जणांना हाताशी धरून केवळ एका महिलेचा अर्ज भरून घेतला आणि या जागेवर संबंधित महिला बिनविरोध विजयी झाल्याचे जाहीर केले, अशी तक्रार सरपंच जिजाबाई हारदे व उपसरपंच राहुल जाधव यांनी केली आहे. त्यामुळे तेथील ग्रामपंचायत पोटनिवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली 
आम्हाला अंधारात ठेवून या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घेतला. सरपंच या नात्याने मला व ग्रामस्थांना ही माहिती देणे गरजेचे होते. गावात दवंडी देणेही गरजेचे होते. मात्र, तलाठी व ग्रामसेवकाने मला कोणतीही माहिती अथवा सूचना दिली नाही. याबाबत मी जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. 
- जिजाबाई हारदे, सरपंच, मांडवे खुर्द 

तक्रारीची शहानिशा करू 
या पोटनिवडणुकीची माहिती देण्याची जबाबदारी गावाच्या ग्रामसेवकाची असून, याबाबत गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. त्यामुळे या गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांच्या तक्रारींची शहानिशा करून योग्य निर्णय घेतला जाईल. 
- ज्योती देवरे, तहसीलदार, पारनेर  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smart Meter Camera: 'महावितरण'च्या स्मार्ट मीटरमध्ये खरंच कॅमेरा आहे का? वीज वितरण कंपनीकडून स्पष्टीकरण

Latur Police Raid: वाढवणा पोलिसांची तिर्रट जुगार अड्ड्यावर धाड; २३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त, ८ जणांविरुद्ध गुन्हा

Inter-State Robbery Gang: ओतूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune News : सासरच्या मंडळींकडून जावयांना मारहाण; एकाचे नाकाचे हाड मोडले, तर दुसऱ्याला बॅटने झोडपले!

Dnyaneshwar Wakade case: बीडमध्ये भररस्त्यात थरार! ज्ञानेश्वरवर दगड, विटा ,चाकूने वार! नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT