Khaki saves eight lives; rescue operation on Agrani river in Morgaon 
पश्चिम महाराष्ट्र

"खाकी'कडून आठ जणांना जीवदान; मोरगावात अग्रणी नदीवर बचावकार्याचा थरार

शैलेश पेटकर

सांगली : पाण्याचा अंदाज न आल्याने अग्रणी नदीवरील पुलावरून पलीकडे जाणारी चारचाकी गाडी पाण्याच्या वेगवान प्रवाहाने नदीपात्रात पडता पडता थोडक्‍यात बचावली. कवठेमहांकाळ पोलिसांच्या बचावकार्यामुळे त्यातील आठ जणांना जीवदान मिळाले. पोलिसांच्या या धाडसी कामगिरीची अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनिषा दुबुले यांनी दखल घेत कौतुकाची थाप दिली.

कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांसह सहा कर्मचाऱ्यांनी रोख बक्षिस आणि प्रशिस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. 
रविवारी (ता. 11) संततधार पावसामुळे अग्रणी नदीला पूर आला. पुलावरून पाणी वाहत असताना रात्री एकच्या सुमारास जत नगरपरिषदेचे सभापती भूपेंद्र कांबळे यांच्यासह आठ जण कोल्हापूरहून देशिंग, मोरगाव, कवठेमहांकाळमार्गे जतकडे चारचाकी (एमएच 10 बी एम 5412) चालले होते.

मोरगावनजीक आल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने गाडीला पाण्याच्या प्रवाहाने ओढ बसू लागली. पुलाच्या मध्यभागी आल्यानंतर पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे गाडीतील प्रवासी घाबरले. त्यांनी आरडाओरड केल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांनी धाव घेत घटनेची माहिती सरपंच रमेश काशीद यांनी पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी तत्काळ फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.

पुलावरून प्रचंड वेगाने पाणी वाहत असताना मध्यभागी अडकलेल्या गाडीपर्यंत जात स्वतःचा जीव धोक्‍यात घालून पोलिसांनी दोरीने एक-एक करत आठ प्रवाशांना बाहेर काढले. एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

पोलिसांच्या सतर्कतेमुळे आठ जणांचे जीव बचावले. पोलिस अधीक्षक गेडाम यांनी कामगिरीचे कौतुक केले. पोलिस निरीक्षक अप्पासाहेब कोळी, सहायक पोलिस फौजदार एस. एच. बाळीगडे यांनी प्रत्येकी पाच हजार रूपयांचे पारितोषिक आणि प्रशिस्तीपत्र देण्यात आले. तर पोलिस कर्मचारी पी. एच. लाड, दीपक गायकवाड, पोलिस नाईक सुहास मोहिते, बाबासो व्हटकर, अमिरीश फकीर, ज्ञानदेव पुणेकर यांना प्रत्येकी सात हजारांचे पारितोषिक आणि प्रशिस्तीपत्र देण्यात आले. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT