Khandoba Maharaj Yatraotsav celebrations from Sunday
Khandoba Maharaj Yatraotsav celebrations from Sunday 
पश्चिम महाराष्ट्र

खंडोबारायाचं याड बाय लागलं मुरळी.... इथं येणार सगळ्या पार्ट्या

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : देवळाली प्रवराचे ग्रामदैवत खंडोबा महाराज यात्रोत्सव रविवारपासून (ता. 9) सुरू होत आहे. दोन दिवस उत्सव चालेल. खंडोबाच्या जेजुरी व पाली या मुख्य क्षेत्रानंतर जागृत देवस्थानापैकी येथील मंदिर आहे. 

अशी आहे परंपरा
माघ पौर्णिमा अर्थात दांडी पौर्णिमेला येथे यात्रा भरते. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. पंचक्रोशीतील शेतकरी नवीन धान्याच्या पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. नवविवाहित जोडीने दर्शनाला येतात. माहेरवाशीण लहान बाळाला घेऊन दर्शनासाठी आवर्जून येते. पंचक्रोशीतील ग्रामस्थ प्रत्येक शुभकार्याला, तसेच पिकांची लागवड व काढणीप्रसंगी श्री गणेशाबरोबर येथील खंडोबाची आराधना करण्याची परंपरा आहे.

लोककलावंतांची असते हजेरी

वार्धक्‍य, आजारपण, आर्थिक अडचणी किंवा अन्य कारणांमुळे श्रीक्षेत्र जेजुरी किंवा पाली येथे जाऊ न शकणारे अनेक भाविक येथे दर्शनास येतात. 
उत्सवात मनोरंजन, मर्दानी खेळ होतात. नगर, नाशिक, औरंगाबाद, पुणे, बीड जिल्ह्यातील अनेक लोककलावंत, बहुरूपी श्रीखंडोबा देवाचे जागरण करणारे वाघ्या-मुरळींची पथके हजेरी लावतात. पालखी मिरवणुकीत सनई, चौघडा, संबळ, संत गाडगेबाबा आश्रमशाळेतील झांजपथक, अश्वस्वारासह सामील होतात. छबिना मिरवणुकीत वैजापूर, चाळीसगाव व पुणे येथील बॅंडचा ताफा असतो. पौर्णिमेच्या रात्री शोभेच्या दारूची आतषबाजी केली जाते.

कुस्त्यांचा फड
दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता कुस्त्यांचा फड असतो. (कै.) स्वातंत्र्यसैनिक सर्जेराव कदम यांच्या स्मरणार्थ "मल्हारी केसरी' ही मानाची चांदीची गदा जिंकण्यासाठी चुरस असते. विजेत्याला ग्रामदैवत त्रिंबकराज चषक दिला जातो. 71 हजार रुपयांची रोख बक्षिसे दिली जातात. रात्री महाराष्ट्राची लोककला लावण्यांचा फड असतो. साईबाबा संस्थानाचे माजी विश्वस्त अजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा समितीचे सदस्य व कार्याध्यक्ष अमित कदम उत्सवाचे नियोजन करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT