Khwaja Mirasaheb Urusat will be in its infancy for the second year in a row 
पश्चिम महाराष्ट्र

ख्वॉजा मीरासाहेब उरुसात दुसऱ्या वर्षीही शुकशुकाट असणार 

शंकर भोसले

मिरज : हिंदू-मुस्लिम एक्‍याचे प्रतीक असलेल्या ख्वॉजा मीरासाहेब उरुसात यंदा सलग दुसऱ्या वर्षीही शुकशुकाट असणार आहे. आज पहाटे चर्मकार बांधवांनी मानाचा गंध गलेफ अर्पण केला. यंदा प्रशासनाकडून देखील कोरोना संसर्गामुळे कडेकोट खबरदारी घेऊन येथील मीरासाहेब दर्ग्याच्या परिसरात आज (ता. 8) रात्री बारा वाजल्यापासून ते 24 मार्च 2021 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून यावर्षीही मीरासाहेब दर्ग्याच्या उरुसास बंदी घालण्यात आली आहे. 

राज्यात सध्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने सर्वत्र प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. याच उपाययोजनांमध्ये सार्वत्रिक यात्रा, जत्रा, उरूस आणि गर्दीच्या कार्यक्रमांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. येथील मीरासाहेब दर्ग्याच्या उरुस आज (ता.9) पासून सुरू होत आहे. या उरुसासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र देशातून लाखो भाविक आणि व्यावसायिक येतात. मात्र यंदा सलग दुसऱ्यावर्षी या उरुसावर प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. कोट्यवधी रुपायांची उलाढाल असणाऱ्या उरुसामध्ये गतवर्षी आणि यंदा तोटा सहन करावा लागणार आहे. 

मिरज उरुसात सर्वसामान्यांसह अनेकांना उरुसानिमित्त रोजगार प्राप्त होतो. गृहोपयोगी वस्तूंसह, मनोरंजन, पाळणे, खेळणे आदींची रेलचेल असते. मात्र गतवर्षी आणि यंदा कोरोनाचे संकट घोंगावत असल्याने पुन्हा खाद्यविक्रेते स्टॉल धारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. उरुसानिमित्त निर्माण होणारे छोटे-मोठे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT