Kidnap made to officer for sand at Jamkhed 
पश्चिम महाराष्ट्र

वाळूसाठी मंडलाधिकाऱ्याचे अपहरण...जामखेडमध्ये तस्करांची आगळीक

सकाळ वृत्तसेवा

जामखेड : पकडलेला वाळूचा ट्रक जप्त करून तहसील कार्यालयात नेत असताना वाळूचोरांनी ट्रकसह मंडलाधिकाऱ्याचेच अपहरण केले. पोलिसांनी त्यांची सुटका गेली. मात्र, नंतर मंडलाधिकारी व तहसीलदारांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. महसूल विभागाने कारवाईसाठी वापरलेल्या खासगी वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. या घटनेचा निषेध म्हणून महसूल कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून "काम बंद' आंदोलन केले. मंडलाधिकारी नंदकुमार गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील किसन आजबे, (रा. जमदारवाडी) व पोपट दिलीप हळनावर (रा. जांबवाडी रोड) आणि अन्य दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तहसीलदार विशाल नाईकवाडे, मंडलाधिकारी गव्हाणे, तलाठी सुखदेव कारंडे, शिवाजी हजारे यांचे पथक जामखेड-अरणगाव रस्त्यावर मध्यरात्री गस्त घालत होते. या वेळी अरणगाव ते खडकत रोडवर वाळू वाहणारा ट्रक (एमएच 16 सीसी 5769) जामखेडकडे येत होता. पथकाने ट्रक अडवून ताब्यात घेतला. आरोपी सुनील आजबेसह ट्रक तहसील कार्यालयात आणत असताना ट्रकमालक पोपट दिलीप हळनावर याने जीपमधून (एमएच 16 बीएच 8251) येऊन ट्रक अडविली. नंतर मालक व चालकाने ट्रक तहसील कार्यालयाकडे न नेता त्यात बसलेल्या मंडलाधिकारी गव्हाणे यांच्यासह पळवून नेला. या वेळी त्यांनी ट्रकमधील वाळूही रस्त्यातच टाकून दिली. हा ट्रक गव्हाणे यांना घेऊन आष्टी (जि. बीड)च्या हद्दीत नेला. 
तहसीलदार नाईकवाडे यांनी तातडीने जामखेड व आष्टी पोलिसांना माहिती दिली. जामखेड पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून आष्टी हद्दीत ट्रक पकडला व गव्हाणे यांची सुटका केली आणि ट्रक आज पहाटे पोलिस ठाण्यात आणला. पोलिसांनी ट्रकचालक पोपट हळनावर यास ताब्यात घेतले आहे. अन्य तीन आरोपी पळून गेले. दरम्यान, या कारवाईत अधिकाऱ्यांनी वापरलेल्या तलाठी शिवाजी हजारे यांच्या मोटारीच्या काचा आरोपींनी फोडल्या. 

महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन 
या घटनेचा महसूल कर्मचाऱ्यांनी आज निषेध केला. तहसीलदार, कर्जत प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन काळ्या फिती लावून "काम बंद' आंदोलन केले. याबाबत दिलेल्या निवेदनावर तलाठी सुखदेव कारंडे, विकास मोराळे, एस. के. खिळे, एस. आर. शेख, ए. पी. जोशी, जी. जे. नागोरे, आर. जे. गावित, एस. एस. हजारे यांच्यासह 32 कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT