पश्चिम महाराष्ट्र

 कोल्हापूर : कर्जाच्या वसुलीसाठी खासगी सावकाराकडून दोघांचे अपहरण 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - दोन लाख 40 हजाराच्या वसुलीसाठी दोघा तरूणांचे मोटारीतून अपहरण करण्यात आले. तसेच त्यांना खासगी सावकारांनी बेदम मारहाण केली. सोमवारी रात्री नाळे कॉलनी ते कागल परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद प्रदीप प्रकाश संकपाळ (वय 29, रा. जनाई दत्तनगर कळंबा) यांनी दिली. 

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नांवे - रोहीत भाले, कार्लोस, अक्षय व त्याच्या चार साथिदार (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) अशी आहेत. 

याबाबत पोलिसानी दिलेली माहिती, प्रदीप संकपाळ हे जनाई दत्तनगर कळंबा येथे राहतात. त्यांचा सलूनचा व्यवसाय आहे. काल रात्री साडेआकराच्या सुमारास प्रदीप व त्यांचा मित्र प्रशांत या दोघांना संशयित रोहीत भालेने नाळे कॉलनी परिसरातील एका शाळेजवळ बोलवून घेतले. त्यानुसार ते दोघे तेथे गेले. तेथे मोटारीत बसलेल्या रोहीतने त्यांच्याकडे कर्जाचे 1 लाख 40 हजार व त्यावरील एक लाखाचे व्याज असे एकूण 2 लाख 40 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्या दोघांना जबरदस्तीने मोटारीत बसवले. त्या मोटारीत रोहीतसह संशयित कार्लोस, अक्षयसह इतर चौघे असे सात जण होते. त्या सात जणांनी ही मोटार कळंबा मार्गे इस्पूर्ली, मुदाळ तिट्टा, आदमापूरच्या दिशेने नेली. तेथे गाडी थांबवली. त्यानंतर त्या सातही जणांनी प्रदीप व प्रशांत या दोघांना मोटारीतून खाली उतरवले व दोघांना लाथाबुक्‍यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्या दोघांना पुन्हा मोटारीत बसवले. मोटार कागलमार्गे लक्ष्मी टेकडी, तावडे हॉटेल येथे मध्यरात्री आणली. तेथे त्या दोघांना सोडून ते मोटारीतून निघून गेले.

या प्रकारानंतर घाबरलेल्या प्रदीप व प्रशांत यांनी जुना राजवाडा पोलिस ठाणे गाठले. येथे प्रदीप यांनी याबाबतची फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अपहरण, खासगी सावकारीसह, मारहाण, धमकी आदी गुन्हे दाखल केले असून संबधिताचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: ससूनमधून परतले, जेवणासाठी महामार्गावर उतरले; काही क्षणांतच सहाय्यक फौजदारावर काळाचा घाला, अज्ञात वाहनाची धडक अन्..

Latest Marathi News Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल

मामा-भाच्यात असं काय घडलं? राजगुरूनगरमध्ये धक्कादायक घटना |

Rohit Sharma: वडापाव नाही, तर टेन्शनच्या वेळी आईच्या हातचा 'हा' पदार्थ आहे कम्फर्ट फूड; रोहितने केला खुलासा

Satara Accident News: ४६ दिवस मृत्यूशी झुंज; बंगळूर महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी प्रतीक काळभोरचा अखेर मृत्यू, एकुलता एक मुलगा गमावला

SCROLL FOR NEXT