kids school teachers used smartphone for official use in balgam 
पश्चिम महाराष्ट्र

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हातात वही ऐवजी आता स्मार्टफोन

मिलिंद देसाई

बेळगाव : सरकारतर्फे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्मार्ट मोबाईलचे वितरण करण्यात आले. त्यामुळे यापुढे, कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारची माहिती मोबाईल ऍपच्या माध्यमातुन द्यावी लागणार आहे. बेळगाव जिल्ह्यात 5300 मोबाईल वितरीत करण्यात आले असुन विभागीय अधिकाऱ्यांकडुन कर्मचाऱ्यांना नविन ऍपबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात यापुढे वही ऐवजी स्मार्ट फोन दिसणार आहेत.

बेळगाव जिल्हात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. तरीही कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा भार आहे. कोराना काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अधिक काम करावे लागले होते.  घरोघरी जाऊन विविध प्रकारची माहिती संकलीत करावी लागते. धान्य वाटप, विद्यार्थ्यांची माहिती इत्यादी कामेही त्यांना करावी लागतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या सुविधा द्या, अशी मागणी सातत्याने होत होती. याची दखल घेत सरकारने कर्मचाऱ्यांवरील कामाचा भार काही प्रमाणात कमी करण्यासाठी मोबाईल वितरण करण्याचा निर्णय काही दिवसांपुर्वी घेतला होता. 

गेल्या आठ दिवसांपासुन कर्मचाऱ्यांना मोबाईलचे वितरण केले आहे. तसेच मोबाईल ऍपचा वापर कसा करावा याबाबतचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. कर्मचाऱ्यांना ऍपच्या माध्यमातुन धान्य वाटपाचा तपशील व इतर प्रकाराची माहिती दररोज द्यावी लागणार असुन सर्व कर्मचाऱ्यांना सॅमसंग कंपनीचा मोबाईल देण्यात आला. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना मोबाईल योग्य प्रकारे हाताळण्याची सुचना करण्यात आली आहे. 

"अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल वितरण करण्याचे काम पुर्ण होत आले आहे. कर्मचारी ऍपच्या माध्यमातुन माहिती देणार आहेत. त्यामुळे विविध प्रकारची माहिती वेळेत देणे शक्‍य होणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी ऍपचा योग्य प्रकारे वापर करावा."

- बसवराज वरवट्टी, उप संचालक, महिला व बाल कल्याण खाते 


"अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर कामाचा भार जास्त आहे. तसेच विविध प्रकारची माहिती संकलीत करावी लागते. आता मोबाईल दिल्यामुळे कामाचा भार काही प्रमाणात कमी होण्यास मदत मिळणार आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर ऍपचा वापर कसा करावा याबाबतची माहिती मिळणार आहे."

- सरीता दत्ता पेडणेकर, अंगणवाडी कर्मचारी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja Visarjan 2026 : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाही होणार विलंब? गिरगाव चौपाटीवरील 'त्या' नैसर्गिक कारणामुळे वाढली चिंता; प्रशासनासमोर मोठं आव्हान

‘आईला सोडून कसा जाऊ? आधी तिला बाहेर काढतो’... शेवटपर्यंत झुंजला, अखेर बस आगीत माय-लेकाचा मृत्यू; अंगठीवरून पटली ओळख

‘तुम्हाला काय प्रॉब्लेम?’ सततच्या चर्चांवर गोविंदांचा सवाल; म्हणाला...‘माझ्या खासगी आयुष्याचा तमाशा करू नका’

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटलांनी डीजेच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

SCROLL FOR NEXT