Yellamma Devi Yatra at Belgaum Kokutner esakal
पश्चिम महाराष्ट्र

'यल्लमा देवी यात्रेतील प्राणी हत्या रोखा'; नवस फेडण्याच्या बहाण्याने हजारो कोंबडी, बकरी, मेंढ्यांचा दिला जातोय बळी

यात्रा आणि अन्य दिवसांत देव आणि धर्माच्या नावाने प्राणी हत्या करण्यावर पूर्णपणे निर्बंध घेण्यात आले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

कोकटनूर येथील होणाऱ्या पशुबळीवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. यात्रेत मोठ्या प्रमाणात पशुबळी होत असल्याने यावर निर्बंध घालावेत, अशी मागणी श्री दयानंद स्वामीजींनी निवेदनाद्वारे केली होती.

बेळगाव : कोकुटनर (ता. अथणी, जि. बेळगाव) येथील श्री यल्लमा देवीची यात्रा (Yellamma Devi Yatra) शनिवारी (ता. ६) ते ११ जानेवारीपर्यंत साजरी करण्यात येणार आहे. यात्रेप्रसंगी कर्नाटकसह महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील हजारो भक्त येत असतात. तसेच देवीला नवस फेडण्याच्या नावाने हजारो कोंबडी, बकरी, मेंढ्या आदींचा बळी देतात.

राज्यात कर्नाटक प्राणी हत्या प्रतिबंधक अधिनियम १९५९ (Animal Slaughter Prevention Act) आणि नियम १९६३ आणि दुरुस्ती कायदा १९७५ अंतर्गत हा शिक्षापत्र गुन्हा आहे. यात्रा आणि अन्य दिवसांत देव आणि धर्माच्या नावाने प्राणी हत्या करण्यावर पूर्णपणे निर्बंध घेण्यात आले आहेत.

यासाठी या यात्रेदरम्यान होणारी प्राणी हत्या रोखण्यात यावी, अशी मागणी विश्व प्राणी कल्याण मंडळ, बसव धर्म ज्ञानपीठ आणि पशु प्राणी बळी निर्मूलन जागृती महासंघाचे अध्यक्ष दयानंद स्वामी यांनी केली आहे. गुरुवारी (ता. ५) शहरात आयोजित पत्रकार परिषदेत स्वामीजी बोलत होते.

केवळ कोकटनूर येथील यात्रेनिमित्त होणारी पशुबळी रोखण्यात न येता राज्यातील विविध ठिकाणी होणाऱ्या यात्रा तसेच अन्य धार्मिक नावाच्या खाली होणारी प्राणी हत्येवर निर्बंध घालण्यात यावेत. तसेच यापुढे असे प्रकार होऊन नयेत, यासाठी असे प्रकार तात्काळ रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावित, अशी मागणी यावेळी दयानंद स्वामींनी केली आहे.

पशुबळीवर निर्बंध

कोकटनूर येथील होणाऱ्या पशुबळीवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. यात्रेत मोठ्या प्रमाणात पशुबळी होत असल्याने यावर निर्बंध घालावेत, अशी मागणी श्री दयानंद स्वामीजींनी निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी यात्रेतील पशु बळीवर निर्बंध घालण्याचा आदेश दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : योगी सरकारचा मोठा निर्णय

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT