Knife on the police 
पश्चिम महाराष्ट्र

कारागृहात बंदिवानाचा पोलिसावर चाकूहल्ला

सूर्यकांत वरकड

नगर : शहरातील मध्यवर्ती कारागृहात (सबजेल) रविवारी पहाटे पळून जाण्यासाठी एका बंदिवानाने बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यावर स्वयंपाकगृहातील चाकू घेऊन हल्ला केला. त्यात ही कर्मचारी जखमी झाली आहे. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पावलस कचरू गायकवाड, असे बंदिवान आरोपीचे नाव आहे, तर कारागृह पोलिस सुरक्षा कर्मचारी सुजाता निवृत्ती शेळके ऊर्फ सुजाता गोपाळ हाडवळे, असे जखमी महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. 


अधिक माहिती अशी ः मध्यवर्ती कारागृहातील कर्मचारी सुजाता शेळके यांची बंदोबस्तासाठी नेमणूक करण्यात आली होती. त्या कर्तव्य बजावीत असताना आज (रविवारी) पहाटे आरोपी पावलस गायकवाड हा स्वयंपाकगृहातील चाकू घेऊन आला. पळून जाण्याच्या उद्देशाने त्याने सुजाता शेळके यांच्या डोक्‍यावर चाकूने वार केला. शेळके यांनी तो डाव्या हातावर झेलला; परंतु हाताला मोठी जखम झाल्याने त्या खाली पडल्या. त्यामुळे आरोपी पावलस गायकवाड हातात चाकू घेऊन कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे गेला. दरम्यान, जखमी सुजाता शेळके यांनी सायरन वाजविल्याने अन्य कर्मचारी तातडीने मुख्य प्रवेशद्वाराकडे धावले. त्यांनी आरोपी पावलस गायकवाडला ताब्यात घेतले, असे कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 


दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, निरीक्षक विकास वाघ यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणि कारागृहातील शिस्तीचा भंग केल्याचा आरोपावरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

न्यायालयीन कोठडीतील बंदिवान 
पावलस गायकवाड हा पारनेर पोलिस ठाण्यातील दाखल असलेल्या, खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश आहे. त्यानुसार गायकवाड याला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. कारागृहातून पळून जाण्यासाठी त्याने चाकूहल्ला केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली. 

न्यायालयाच्या परवानगीने कारवाई 
आरोपी बंदिवान असल्याने त्याला लगेच अटक करता येत नाही. न्यायालयाच्या परवानगीने आरोपीला गुन्ह्याच्या तपासाकामी ताब्यात घेण्यात येईल. 
- संदीप मिटके पोलिस उपअधीक्षक, शहर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Protest : आमदार यड्रावकरांनंतर आता आवाडेंच्या साखर कारखान्याची ऊस वाहतूक अडवली; स्वाभिमानी कार्यकर्ते आक्रमक

Tulsi Ganesha Curse Story: तुळशी मातेला श्रीगणेशाने का दिला होता श्राप? जाणून घ्या पौराणिक कथा

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये शेतकरी आक्रमक, टायर पेटवून समृद्धी महामार्ग रोखला

Goa-Solapur flight: वादळी वाऱ्याचा धोका; गोवा-सोलापूर विमान रद्द, प्रवाशांना पुढील तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार

मोंथा चक्रीवादळाने अरबी समुद्र खवळला, उरणमध्ये ३ बोटी भरकटल्या; 50 मच्छिमारांशी संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT