Kokrud villege people ran for the help of animals at corona 'Hotspot' Mandoor 
पश्चिम महाराष्ट्र

मुक्‍या जनावरांसाठी धावले कोकरुडकर; 'हॉटस्पॉट' मनदूरला केली ही मदत

सकाळवृत्तसेवा

कोकरुड (जि. सांगली) : शिराळा तालुक्‍यातील पश्‍चिम भागात चांदोली धरण पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या व सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मणदूर गावातील मुक्‍या जनावरांसाठी कोकरुड येथील युवक एकवटले व सुमारे 1500 पेंडी सुका चारा पोहोच केला. 

30 मे रोजी मणदूर या गावात 81 वर्षाच्या वृद्धाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि एक एक करत गावात कोरोना रुग्णांची साखळी वाढत गेली. गावावर कोरोनाचे संकट कोसळले. गाव कोरोनाचा हॉटस्पॉट बनले. यामुळे गावातील लोकांना अनेक समस्या भेडसावू लागल्या. सांगली जिल्ह्यात सर्वांत जास्त कोरोना 110 रुग्ण शिराळा तालुक्‍यामध्ये असून त्यातील 61 रुग्ण मणदूर मध्ये आहेत. त्यामुळे संपूर्ण गाव व परिसरातील वाड्या भीतीच्या छायेत वावरत आहेत. 

3144 लोकसंख्या असलेल्या या गावात 1644 लोक कंटेमेंन्ट झोनमध्ये राहत आहेत. घरातून बाहेर पडता येत नसल्याने शेतीची कामे तर करता येत नाहीतच, पण जनावरांसाठी चाराही आणता येत नाही. त्यामुळे चारा टंचाईचा फटका येथील 690 एवढ्या पशुधनास बसला आहे. शेतीप्रधान गाव असलेल्या मणदूरमध्ये घरटी दुभती जनावरे आहेत.

मात्र गावामध्ये कोरोनाचा वाढत संसर्गामुळे गाव सील असून, शेतकरी वर्गाला बाहेर पडणे कठीण झाले आहे. जनावरांसाठी चारा आणणे कठीण झाले आहे. त्यामुळे पशुधनाची देखील उपासमार होत आहे. याचीच दखल घेत कोकरुड येथील युवकांनी घरोघरी फिरून कडबा व गवत असा सुका चारा गोळा करून, तो ट्रॅक्‍टरच्या हाय्याने मणदूर या गावी पोहोच केला. यामुळे चाऱ्याअभावी होणारे मुक्‍या जनावरांचे हाल थांबले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT