Kolhapur Crime Esakal
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Crime: कोल्हापुरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची दादागिरी! हात पाय बांधून तरुणांना केली बेदम मारहाण; ७ जणांवर गुन्हा दाखल

Kolhapur Crime News: इचलकरंजीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी चार मुलांना अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोक्यातून सुटलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार श्याम लाखे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी चार मुलांना मारहाण केल्याचे समोर आले आहे.

ऋषिकेश राऊत, अंकिता खाणे (Ankita Khane)

इचलकरंजीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी चार मुलांना अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोक्यातून सुटलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार श्याम लाखे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी चार मुलांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इचलकरंजीमध्ये रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांकडून चार तरुणांना बेदम मारहाण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

हात पाय बांधून एका बंद खोलीत या मुलांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे व्हिडिओ सध्या समोर आले आहेत. मोक्याच्या गुन्ह्यातून सुटलेला गुन्हेगार श्याम लाखे आणि त्याच्या साथीदारांकडून ही मारहाण करण्यात आली आहे. तरुणाचे पाय बांधून चौघांच्या मदतीने श्याम लाखे हा लोखंडी पाईपने मारहाण करताना दिसत आहे.

या घटनेनंतर शहरातून सोशल मीडियावर मोठा संताप व्यक्त झाल्यानंतर याची दखल शहापूर पोलिसांनी घेतली. याप्रकरणी लाखे याच्यासह त्याचे वडील, आदर्श उर्फ आद्या, माया, सुरज यांसह एकूण ७ जणांवर (सर्व रा.दत्तनगर, शहापूर) गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर अपहरण, बाल न्याय कायद्यासह विविध सहा कलमाखाली गुन्हा दाखल झाला. या जीवघेण्या मारहाणीत रावसाहेब प्रकाश वडर (वय19) यांसह चार मुले (सर्व रा.जयभीमनगर, इचलकरंजी)जखमी झाली आहेत. मुलांचे अपहरण करून ही मारहाणीची घटना लाखे याच्या घरी दत्तनगर गल्ली नं. ४ मध्ये घडली असून याची नोंद पोलिसांत रात्री दहा वाजण्याच्या सुमारास झाली आहे.

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, डुक्कर मारण्याचा कारणावरून संशयित तिघांनी फिर्यादी रावसाहेब वडर याच्यासह जखमी चार मुलांना जबरदस्तीने गाडीवर बसवले आणि शाम लाखे याच्या घरी आणले. मुलांना शिवीगाळ करत दोघांनी वडर याचे हात पाय धरले. त्यानंतर लाखे याने त्याला पुन्हा शिवीगाळ करून लोखंडी पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली. वर्धमान चौकाकडे दिसायचे नाही. इकडे आलास तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देवून आता मला दर महिन्याला पैसे द्यावे लागतील अशी खंडणीची मागणी केली आणि जवळील ३ हजार रुपये देण्यास भाग पाडले.

बेदम मारहाण करताना मुलांचा आरडाओरडा हृदयद्रावक होता. या मारहाणीचा व्हिडिओ चित्रिकरण केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावरून संपूर्ण शहरभर पसरला. दरम्यान आज याप्रकरणी शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup Rising Stars: तिलक वर्माच्या भारतीय संघाचं आव्हान सेमीफायनलमध्येच संपलं! श्रीलंकेकडून दारुण पराभव

Hinjewadi Metro : हिंजवडी-वाकडमधील मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पीएमआरडीएचा निर्णय; २६ जोडरस्त्यांचा विकास, डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामांना सुरुवात

High Court Gift Deed Ruling : "२० वर्षांपूर्वी सुनेला बक्षीसपत्राने दिलेली मालमत्ता सासूला परत मागता येणार नाही!" उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Pune News : स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला ‘डीआयएटी’चे बळ; अत्याधुनिक लेझर आणि फोटॉनिक्स प्रणाली विकसित करणार

Jalgaon Jalna Railway Line Tunnel : मराठवाडा-खानदेशचा प्रवास सुसाट होणार! जळगाव-जालना रेल्वे मार्गावर बनणार देशातील सर्वात मोठा २३.५ किमीचा बोगदा; ३३६ किमीचे अंतर येणार थेट निम्म्यावर!

SCROLL FOR NEXT