पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर - काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

सुनील पांडुरंग पाटील

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant jadhav) यांचे हैदराबाद इथं निधन झाले.

कोल्हापूर - काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant jadhav) यांचे हैदराबाद इथं निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते. हैदराबादमधून त्यांचे पार्थिव दुपारी एक वाजेपर्यंत कोल्हापुरात आणण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला होता. मनमिळावू व कार्यतत्पर अशी ओळख असणाऱ्या जाधव यांच्या मृत्यूने उद्योगासह राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या दीड वर्षापासून त्यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते ठणठणीत बरे झाले होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT