nipani bus depo sakal media
पश्चिम महाराष्ट्र

Nipani : दिवाळीत जादा बसमुळे दिलासा

दोन वर्षापासून कोरोना, अतिवृष्टी, महापुरामुळे बसेस पूर्ण क्षमतेने धावल्या नाहीत. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी असून शासनाने सर्व नियम शिथिल केले आहेत

सकाळ वृत्तसेवा

निपाणी : दोन दिवसापासून दिवाळी सण सुरु झाला आहे. त्यामुळे माहेरवासिनींसह प्रवाशांची विविध मार्गावर ये-जा सुरु आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी निपाणी आगाराने बेळगाव, हुबळी, बंगळूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई, सदलगा, बोरगाव, मांगूर, खडकलाट मार्गावर जादा बसेस सुरु केल्या आहेत.

दोन वर्षापासून कोरोना, अतिवृष्टी, महापुरामुळे बसेस पूर्ण क्षमतेने धावल्या नाहीत. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी असून शासनाने सर्व नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे दिवाळीनिमित्त निपाणी आगारातून जादा बसेस सुरु केल्या आहेत. ज्या मार्गावर प्रवाशांची संख्या वाढते, त्या मार्गावरही बससेवा दिली जात आहे. त्यामुळे प्रवाशांतून समाधानाचे वातावरण असून त्यांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी बससेवा सुरु नसल्याने खासगी वडापचा आधार घ्यावा लागत होता. मनमानी दर आकारणी असल्याने प्रवाशांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड बसत होता. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर निपाणी आगाराने जादा बसेसचे नियोजन केल्यामुळे आगाराला उत्पन्न वाढीसाठीही मदत होणार आहे. बेळगाव, बोरगाव मार्गावर प्रवाशांची संख्या वाढत असल्याने त्या मार्गावर अतिरिक्त बस सोडाव्या लागत आहेत.

`दिवाळी सणात होणारी प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन विविध मार्गावर जादा बसेस सुरु केल्या आहेत. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ज्या मार्गावर प्रवासी वाढतील, त्या मार्गावर पुन्हा जादा बस दिली जात आहे.`

-मंजुनाथ हडपद, आगार व्यवस्थापक, निपाणी

जादा बससेवा दृष्टिक्षेपात...

मार्ग धावणाऱ्या बसेस

बंगळूर 2

बेळगाव 8

सदलगा 4

भोज 4

मांगूर 6

बोरगाव 8

मुंबई 4

पुणे 6

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT