पश्चिम महाराष्ट्र

आजऱ्यातील ७६ प्राथमिक शाळा झाल्या डिजिटल

सकाळवृत्तसेवा

आजरा - आजचे युग हे डिजिटलायझेशनचे युग आहे. स्पर्धेच्या या काळात माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. याचा वापर विविध क्षेत्रात होत आहे. यामध्ये शिक्षणाचे क्षेत्रही मागे नाही. खासगी शाळांत याचा वापर सुरू आहे. पण यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळाही मागे नाहीत. तालुक्‍यात १२१ पैकी ७६ शाळा डिजिटल झाल्या आहेत. अन्य शाळाही डिजिटल करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असून यासाठी पाठपुरावा सुरू आहे. यामुळे शिक्षणाची प्रक्रिया सुलभ झाली आहे. 

आजरा तालुका हा जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवरचा तालुका मानला जात आहे. शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध परीक्षा यासह विविध परीक्षा, सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रामध्ये या तालुक्‍यातील विद्यार्थी चमकले आहेत. यापाठीमागे शिक्षकांचे कष्ट आहे. प्रत्येक गावातील शाळा व्यवस्थापन समिती व आजरा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे सहकार्य राहिले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा खासगी शाळांच्या तुलनेत नवनवीन तंत्रज्ञानामध्ये पुढे आहेत. अशी तुलना होत होती. नव्या युगात मराठी शाळांचे काय होणार? असा प्रश्‍न उपस्थित होत असतो. पण शिक्षण विभागाने या काही वर्षात शिक्षकांच्या सहकार्याने प्राथमिक शाळेत आधुनिक तंत्रज्ञाचा वापर सुरू केला आहे. ई-लर्निंग, इंटरनेट व मोबाईल यांच्यामाध्यमातून शिक्षण दिले जात आहे. यासाठी शिक्षकांना आवश्‍यक प्रशिक्षण ही दिली आहेत. 

तालुक्‍यातील सर्वच शाळा डिजिटल करण्यासाठी विशेष प्रयत्न या विभागाचे आहेत. सुलगाव, विवेकानंद, कन्या, कुमार आजरा, खेडे, मडिलगे, कासारकांडगाव, जाधेवाडी, भादवण, भादवणवाडी, हाजगोळी बुद्रुक, कोवाडे, मासेवाडी, पेद्रेवाडी, निंगुडगे, सरोळी, श्रृंगारवाडी, मुरुडे, बुरुडे, चाफवडे, चितळे, दाभिल, शेळप, गवसे, हाळोली, देवर्डे, इटे, एरंडोळ, पोळगाव, सुळे, हात्तिवडे, मलिग्रे, होनेवाडी, सरंबळवाडी, गजरगाव, कानोली, चिमणे, हालेवाडी, वझरे, वडकशिवाले, महागोंड, होन्याळी, कर्पेवाडी, हरपवडे, सोहाळे, पेरणोली, साळगाव, बोलकेवाडी, सिरसंगी, कोळींद्रे, किणे, एमेकोंड, मेंढोली, पेंढारवाडी, बहीरेवाडी, कुमार व कन्या उत्तूर, मुम्मेवाडी, आरदाळ, चव्हाणवाडी, धामणे, बेलेवाडी, झुलपेवाडी या शाळा डिजिटल झाल्या आहेत. 

माहिती तंत्रज्ञानाच्या काळात विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांना वापर करता यावा. शिक्षणाची प्रकिया गतिमान व सुलभ व्हावी. विद्यार्थी हा शिक्षणाचा केंद्रबिंदु व्हावा. ही यामागची भूमीका आहे. यामध्ये शिक्षकांची भूमिका ही मार्गदर्शकाची राहणार आहे.
- आनंदा पेंडसे,
विषय शिक्षक विद्यामंदिर शेळप, आजरा

उर्वरीत सर्व शाळा चौदावा वित्त आयोग व लोकसहभागातून डिजीटल करण्याची कार्यवाही सुरु आहे. पुढील महिनाअखेर या शाळा डिजीटल करण्यासाठी प्रयत्न आहेत. पाठपुरावा सुरु आहे. लोकसहभाग, देणगी व स्वयंसेवी संस्था यामाध्यमातून आर्थिक मदत उभी केली जाणार आहे. 
- टी. एस. मोळे,
गटशिक्षणाधिकारी, आजरा पंचायत समिती

कमी पटाच्या १२ शाळा डिजिटल
वीस पटापेक्षा कमी पट असलेल्या १२ शाळा डिजीटल झाल्या आहेत. यामध्ये गणेशवाडी, हाजगोळी खुर्द, दाभिलवाडी, आल्याचीवाडी, परोलीवाडी, रायवाडा, कागिनवाडी, हारुर, घागरवाडी, बाची, पोश्रातवाडी व हंदेवाडी या शाळांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT