पश्चिम महाराष्ट्र

इचलकरंजीत एसटीच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार

राजेंद्र होळकर

इचलकरंजी -  वनवे तोडून येणाऱ्या भरधाव एसटी बसची समोरुन येणाऱ्या मोटरसायकलस्वाराला जोराची धडक बसली. या धडकेत मोटरसायकलस्वार ठार झाला. रमेश आण्णाप्पा लाटकर ( वय ३४, रा.साजणी, ता. हातकणगंले, जि. कोल्हापूर ) असे त्याचे नाव आहे. हा अपघात सकाळी साडेनऊच्या सुमारास इचलकरंजी शहरातील मुख्य रोडवरील के.एल.मलाबादे चौकाशेजारी झाला आहे. 

मृत रमेश लाटकर हे साजणी ग्रामपंचायत सदस्या सुजाता लाटकर याचे दिर होत. येथील एका खाजगी कंपनीमध्ये मृत श्री.लाटकर नोकरी करीत होते. आज सकाळी कंपनीमध्ये कामासाठी मोटरसायकलवरुन ते येत होते. इचलकरंजीतील मुख्य मार्गावरील मध्यवर्ती एसटी बस स्थानक ते के.एल. मलाबादे चौक या दरम्यान सर्व वाहनासाठी एकेरी वाहतुक मार्ग आहे. याच एकेरी मार्गावर हा अपघात झाला. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT