पश्चिम महाराष्ट्र

वीज कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याला लाच घेताना पकडले

राजेंद्र होळकर

इचलकरंजी - येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महाकंपनीच्या उप कार्यकारी अभियंत्याला लाच घेताना कोल्हापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले.  वीज ग्राहकाकडून अपार्टमेंटकरीता वीज जोडणीचे कनेक्‍शनला मंजूरी देण्यासाठी 25 हजार रूपयाची लाच त्यांनी मागितली होती. ती स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले.

रणजीत बाळासो पाटील (मुळ रा. खोची, ता. हातकणंगले, सध्या रा. कसबा बावडा, कोल्हापूर) असे लाचखोर उप कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणाची नोंद करण्याचे काम गावभाग पोलिसात सुरू आहे. लाचखोर अभियंता रणजीत पाटील एक वर्षापूर्वीच पेठवडगावहून येथील स्टेशन रोडवरील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महाकंपनीच्या कार्यालयामध्ये बदलीहून आले आहेत. त्यांच्याकडे येथील गर्व्हेमेंट कॉन्ट्रॅक्‍टर उमेश निशिकांत माळी (रा. काडापूरे तळ, इचलकरंजी) यांनी सहा महिन्यापूर्वी शहरातील सप्तसागर व राधाकृष्ण डेव्हलपर्सच्या अपार्टमेंटमध्ये वीज कनेक्‍शन मिळावे या करीता अर्ज केला होता. हा अर्ज मंजूर करण्यासाठी पाटील याने माळी याच्याकडे 27 हजार रूपयाची लाच मागितली होती. तडजोडी अंती 25 हजार रूपयावर व्यवहार ठरला. या ठरलेल्या व्यवहाराची रक्कम आज दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास पाटील येथील स्टेशन रोडवरील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात घेत असताना कोल्हापूर लाच लुचपत विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडून अटक केली. कार्यालयात लाच लुचपत विभागाने उपकार्यकारी अभियंता पाटील याला पकडले असल्याची माहिती पसरताच कार्यालयात एकच खळबळ उडाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT