पश्चिम महाराष्ट्र

हा फक्त काँग्रेसचाच आक्रोश - चंद्रकांत पाटील

निखील पंडितराव

कोल्हापूर -  घोटाळे, भ्रष्टाचार, काळा पैसा, महागाई यामुळे देशाला दिवाळीखोरीत लोटण्याचे काम साठ वर्षे काँग्रेसने केले. याला कंटाळूनच देशातील व राज्यातील जनतेने भाजपला सत्ता दिली. देशात व राज्यात ज्या पद्धतीने विकासाचे नवे पर्व सुरू आहे, ते पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकून त्यांच्यावर स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आक्रोश आणि पश्‍चात्ताप करण्याची वेळ आली आहे. स्वतःचा आक्रोश म्हणजे जनतेचा आक्रोश, असे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेस करत असल्याचे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. जनतेने केवळ देश व राज्य चालविण्यासाठी भाजपला बहुमत दिले नसून गरिबांचा तो जनादेश आहे. नोटाबंदीमागे गोरगरीब ज्या ठामपणे उभे आहेत, त्यावरून निर्णयाच्या यशाची कल्पना येते. विरोधकांकडून आता सगळे मुद्देच हिसकावले गेल्याने ते सैरभैर झाले आहेत. नोटाबंदीनंतर पैशांची टंचाई असतानाही महाराष्ट्रासह विविध राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत १० हजारपैकी भाजपने ८००० जागा जिंकल्या, तर उत्तर प्रदेशात सत्ता स्थापना केली.’’

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने विकासाचे पर्वच आणले आहे. शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू मानून राज्याचा अर्थसंकल्प हा शेतीपूरक आहे. सौरऊर्जेसह कृषी पंपांना पुरेशी वीज, आठवडा बाजार, बाजार समितीत शेतकऱ्यास मताचा अधिकार, सोयाबीन, तूर खरेदी, जलयुक्त शिवार योजनेतून गावे दुष्काळमुक्त झाली.

कृषी विकासाचा दर वाढत जाऊन तो साडेबारा टक्‍क्‍यांवर गेला. शेतीतील गुंतवणूक तीस टक्‍क्‍यांहून अधिक झाली आहे. सत्तर लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. काँग्रेसच्या काळात श्रीमंत आणि राजकारणी शेतकरीच कर्जमाफीचे लाभार्थी होते. संकुचित मनाच्या काँग्रेसला हा विकास दिसणार नाही; पण गोरगरीब जनतेला विकास झाल्याचे चांगले माहीत असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, ‘‘तीन वर्षांत आम्ही जे करून दाखविले त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. देशातील लाखो लोकांना रोजगार देण्यासाठी तळागाळातल्या छोट्या मोठ्या उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर भांडवल पुरवून प्रचंड रोजगार निर्माण करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली आहे. यातून अडीच वर्षांत १.६८ कोटी लघुउद्योजकांनी साडेतीन लाख कोटी रुपये कर्ज घेऊन साडेपाच कोटी रोजगार निर्मितीमध्ये हातभार लावला आहे. महाराष्ट्रातील तब्बल ३५.३५ लाख लोकांनी तब्बल ३४ हजार कोटी कर्ज घेऊन उद्योग क्षेत्रात भरभराट आणली आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT