पश्चिम महाराष्ट्र

डहाकेंच्या लेखनातून मानवी मूल्यांचे वर्धन - डॉ. गणोरकर

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - ‘संतुलित, तटस्थ, कोणाचाही अधिक्षेप न करणारे; तसेच मानवी मूल्यांचे वर्धन करणारे लेखन वसंत आबाजी डहाके यांनी केले. त्यांच्या कवितांमधून काळाच्या पुढील निर्मितीचा ध्वनी झंकारताना जाणवतो,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ मराठी साहित्यिक व समीक्षक डॉ. प्रभा गणोरकर यांनी येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागामार्फत वि. स. खांडेकर भाषाभवन सभागृहात ‘वसंत आबाजी डहाके यांचे साहित्य’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र झाले. त्या वेळी बीजभाषक म्हणून डॉ. गणोरकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक चौसाळकर होते. मानव्य विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले.

डॉ. गणोरकर म्हणाल्या, ‘‘कविता म्हणजे वाक्‍य नव्हे, तर ती मानवी मूल्यांची अभिव्यक्ती असते. त्यांचे शाश्वत मूल्यांत रूपांतर करणे हे कवीचे कार्य आहे. १९५० पासून डहाके यांचे लेखन प्रकाशित होत असले, तरी त्यांना मान्यता मिळवून देणारी कविता म्हणजे ‘योगभ्रष्ट’.  या कवितासंग्रहामध्ये पुढील काळाच्या निर्मितीची जनुकीय गुणसूत्रे आहेत. भौतिक, सामाजिक, राष्ट्रीय, वास्तव, मानवी दु:ख कमी करण्याचे संवेदनशील विचारवंतांनी केलेले प्रयत्न या सर्वांचे प्रतिबिंब व विश्‍लेषण त्यांच्या साहित्यामध्ये आढळते. छोट्या-छोट्या टिप्पणीतूनही डहाके यांची जीवनदृष्टी व्यक्त होते. एकाच वेळी अनेक गोष्टींचे संदर्भ दृश्‍यकलेमध्ये त्यांच्या लेखनातून पेरले जातात. त्यांनी मराठीमधील गेल्या सातशे वर्षांत निर्माण झालेल्या कविता केवळ वाचलेल्याच नाहीत, तर त्या अत्यंत चिकित्सकपणे अभ्यासलेल्या आहेत. 

वसंत डहाके म्हणाले, ‘‘कवी, कादंबरीकारांना अनुकूल अथवा प्रतिकूल शेरे मिळाले; तरी त्यांना त्यांचे लेखन चालूच ठेवावे लागते. साहित्य, कला यांबद्दल जे जाणवते, ते लिहिले पाहिजे. आपल्या लिखाणातून सामान्य नागरिकाची संवेदनशीलता जपण्याला प्राधान्य दिले पाहिजे.’’

डॉ. चौसाळकर, डॉ. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. वसंत पाटणकर, डॉ. रणधीर शिंदे उपस्थित होते. मराठी अधिविभागप्रमुख राजन गवस यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची SIT सोबत बैठक

SCROLL FOR NEXT