पश्चिम महाराष्ट्र

विक्रमनगरात ऐक्‍याचा आदर्श जपणारा गणेशोत्सव

सुधाकर काशिद

तीन कॉलन्यांची एकच मूर्ती - कलानंद, त्र्यंबोली, प्रगती कॉलनीतील नागरिकांचा अनुकरणीय पायंडा
कोल्हापूर - कलानंद, त्र्यंबोली आणि प्रगती या विक्रमनगरात तीन कॉलन्या. यातील प्रगती कॉलनीत ९० टक्के रहिवासी मुस्लिम; पण या तिन्ही कॉलन्यांची एकजूट अशी की, गणेशोत्सवात तिन्ही कॉलन्यांची मिळून एकच सार्वजनिक गणेशमूर्ती.

मूर्तीचे आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत सगळे हातात हात घालून राबतात. आरती, रोजची पूजा, प्रसाद वाटप, गणेश मंडपाची सुरक्षा यात मुस्लिम युवकांचाही सर्वांच्या बरोबरीने सहभाग आणि वर्गणी गोळा करायची पद्धत तर अनोखीच. या तीन कॉलनीत बाहेरच्या कोणी वर्गणी मागायला यायचे नाही आणि या कॉलनीतल्याही कोणी बाहेर वर्गणी मागायला जायचे नाही.

याही वर्षी याच पद्धतीने गणेशोत्सवाची तयारी झाली आहे आणि गणेशोत्सव केवळ एका धर्माचा, वर्गणी म्हणजे जणू खंडणी, सोहळा म्हणजे डॉल्बी असे मानणाऱ्यांनी एकदा हा गणेश उत्सव पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल ३२ वर्षे याच पद्धतीने या सोहळ्याची परंपरा चालू आहे.

या तीन कॉलनीत मिळून गेट टुगेदर फ्रेंडस्‌ सर्कल आहे. नावाला साजेसे असेच हे मंडळ आहे. या मंडळाच्या माध्यमातून या सोहळ्याचे आयोजन केले जाते. 

तिन्ही कॉलनीतील रहिवाशांना सोयीचे होईल, अशा जागी गणेश उत्सव केला जातो. प्रत्येक घरातील व्यक्तींचा प्रतिष्ठापना, विसर्जन मिरवणुकीत सहभाग असतो. कॉलनीत मुस्लिम रहिवासी असल्याने नमाजच्या वेळी उत्सवातील गाणी, जल्लोष थांबवला जातो. विसर्जन मिरवणूक जल्लोषात फक्त तीन कॉलनीपुरतीच मर्यादित असते. कॉलनीची हद्द संपली की जल्लोष थांबवला जातो व गणपती स्वतंत्र वाहनाने नेऊन कोटीतीर्थात दान केला जातो.

वर्गणी गोळा करण्यासाठी पारंपरिक पद्धत वापरली जाते. तिन्ही कॉलनीतील रहिवाशांकडूनच स्वेच्छेने वर्गणी घेतली जाते. बाहेर कोठेही वर्गणी मागायला कोणी जात नाही व इतर मंडळांचे कोणी वर्गणी मागायला आले तर त्यालाही या कॉलनीत वर्गणी दिली जात नाही. गणेशाच्या आरतीला मान्यवरांना न बोलावता कॉलनीतील रहिवाशांनाच तो मान दिला जातो. दोन-तीन वर्षांतून एकदा तिन्ही कॉलनीत ‘चूल बंद’ कार्यक्रम म्हणजे सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

सोहळ्याची ओढ 
या सोहळ्याची ओढ या तिन्ही कॉलनीतील रहिवाशांना एवढी आहे की, नोकरीसाठी अमेरिकेत असलेला विनित मांजरेकर, रशियात असलेला धीरज पाटील, बाॅम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये असलेला अमर माने गणेशोत्सवासाठी हमखास कॉलनीत येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई गोवा हायवेवर महाकोंडी! ३ तासांच्या प्रवासाला १२ तास, एसटीतील प्रवाशांचा संताप

पावसाने रोखला गणेशभक्तांचा मार्ग! शनिवारच्या रात्रीत ६ हजार वाहनांचा प्रवास; रविवारी राहणार सर्वाधिक रहदारी

Sangli Ganpati: सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! बबलूनंतर आसाममधून येणार नवा हत्ती; गणपती संस्थानचा वैभवशाली थाट कायम राहणार

Marathi News Live Updates : पेपरफुटीला कायमचा आळा घालण्यासाठी झिरो लीक सिस्टीम; परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल, ऐनवेळी प्रश्नपत्रिका तयार करून ऑनलाइन वितरणाचा प्रस्ताव

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT