पश्चिम महाराष्ट्र

पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांच्या वाट्याला अखेर ‘अच्छे दिन’ आले आहेत. चार ते पाच हजार रुपयांवर राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने घसघशीत अशी पगारवाढ केली आहे. किमान वेतन अधिनियमानुसार ही पगावाढ झाली आहे. विक्रेत्यांच्या कमिशनमध्येही वाढ करण्यात आली आहे.

जिल्ह्यात विविध पेट्रोल पंपांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे चार ते पाच हजारांच्या घरात आहे. आजपर्यंत हे कामगार असंघटित होते. डीलरच्या मनात आले तर पगारवाढ अन्यथा आठ ते दहा तास एकाच जागेवर उभे राहून पेट्रोल आणि डिझेल सोडावे लागते. ग्रामीण भागातील हातावर पोट असलेले कर्मचारी पंपावर कामाला आहेत. दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची संख्या इतकी वाढली आहे की, सकाळी सातला पंप चालू झाला की, रात्री अकरापर्यंत वर्दळ असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना चहालाही सवड मिळत नाही. एक-दोन गाड्या थांबवायच्या, किटलीतील चहा स्वतःच ओतून कपबशीत भरायचा आणि तलफ भागवायची, असा नित्यक्रम आहे.

जिल्ह्यात सर्वच प्रकारांच्या वाहनांची संख्या सुमारे बारा लाखांवर गेली आहे. पेट्रोल पंप ग्रामीण भागातील असो अथवा शहरातील, पंपावर नेहमीच वर्दळ नजरेस पडते. शहरात तरी वाहनांचा रात्रंदिवस राबता असतो. वाहनांचा धूर, त्यातून होणारे प्रदूषण यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होतो.
गेल्या अनेक वर्षांपासून महिन्याला कर्मचाऱ्यांचा रोखीने पगार होत होता. आता सर्व व्यवहार रेकॉर्डवर आणण्याचा फायदा कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या निमित्ताने झाला आहे. या महिन्यापासून पगार ऑनलाईन बॅंकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांची खाती आधार कार्डद्वारे लिंक होतील. 

१५० केएल (दीड लाख लिटर) विक्री असणाऱ्या पंपाच्या व्यवस्थापकाचा पगार २० हजार ६३४ इतका असेल. यात ईएसआय, ईपीएफ, बोनस, वार्षिक रजा, ग्रॅच्युइटी यांचा समावेश असेल. कॅशिअरचा पगार १९,९९२ रुपये इतका असेल. पंप अटेंडर्सचा पगार १६ हजार ४६६, तर एअर बॉय आणि स्वीपर यांचा पगार १४ हजार ५५९ इतका असेल. यात ईएसआय, ईपीएफ, बोनस, वार्षिक रजा, ग्रॅच्युइटी यांचा समावेश आहे.

...तर कमिशन कपात
जे डीलर नवी पगारवाढ देणार नाहीत त्यांच्या कमिशनमध्ये कपातीचे आदेश देण्यात आले आहेत. दर महिन्याला होणाऱ्या तपासणीवेळी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा आढावा घेतला जाईल. ऑगस्टपासूनच पगारवाढ लागू झाली तरी अंमलबजावणी या महिन्यापासून होत आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचारी पहिल्यांदाच या निमित्ताने रेकॉर्डवर आले आहेत. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीच्या निर्णयाचे कर्मचाऱ्यांतून स्वागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT