पश्चिम महाराष्ट्र

रंकाळ्यात महाकाय मृत कासव

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - सुमारे साडेचार फूट लांबीचे महाकाय मृत कासव आज रंकाळा तलावात आढळले. स्थानिक नागरिकांनी त्याला काढले. बरेच दिवस कासव मरून पडल्याने त्यास दुर्गंधी सुटली होती. दरम्यान, मृत कासव सापडले असले, तरी इतक्‍या मोठ्या आकाराची कासवे रंकाळ्यात असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.

तांबट कमानी परिसरात फिरायला येणाऱ्या नागरिकांना सायंकाळी दुर्गंधी जाणवली. ती नेमकी कुठून येते, याची माहिती घेतली असता तेथेच मृत कासव असल्याचे लक्षात आले. प्रचंड दुर्गंधी असल्याने मात्र ते बाहेर काढण्यासाठी कुणी पुढे येत नव्हते. अखेर महेश पाटील, शाहीर राजू राऊत, अमर पाटील, अमर जाधव आदींनी पुढाकार घेऊन कासवाला पाण्याबाहेर काढले. रंकाळा तलाव मोठ्या प्रमाणात जैवविविधतेने समृद्ध आहे. पाणथळ जागा असल्याने पक्ष्यांचे वास्तव्य मोठे आहे.

पूर्वी कासवांचे प्रमाण अधिक होते. पावसाळ्याच्या तोंडावर कासवे हमखास नजरेस पडायची. काही वर्षी जलपर्णींचा विळखा, ब्ल्यू ग्रीन अलगीमुळे पाण्याचे प्रदूषण यामुळे कासवांची संख्या कमी झाली. अलीकडच्या काही वर्षांत कासव फारसे नजरेस पडत नव्हते. आज अचानक मोठे कासव आढळून आल्याने अनेकांना धक्का बसला. दुर्गंधी सुटल्यानंतर अमर जाधव, राजू राऊत यांनी कंपाउंडवरून उतरून कासव बाहेर काढले. दुर्गंधी अधिक पसरू नये यासाठी कासव कोंडाळ्यात टाकले गेले.

पूर्वी रंकाळा तलावात छोटी-मोठी कासवे आढळून येत होती. प्रदूषणामुळे अलीकडे त्यांची संख्या कमी झाली. रंकाळ्यात अजूनही जे सांडपाणी मिसळते त्यामुळेच या कासवाचा मृत्यू झाला. मृत कासव रंकाळ्याच्या नाल्याच्या बाजूने वाहत येऊन पद्माराजे गार्डनच्या भागात पोचले. त्याचे वजन अंदाजे ४० किलोच्या पुढे होते. अशा पद्धतीने जैवविविधता नष्ट होणे हे गंभीर आहे.
- अमर जाधव,
मच्छीमार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीत दुपारी ३ वाजेपर्यंत ४०.३६ टक्के मतदान

IPL 2026 : MI vs CSK सामन्यापूर्वी ऋतुराजचा मोठा डाव! आयुष म्हात्रेच्या जागी Mumbai Indians च्या खेळाडूला आपल्या संघात घेतले

अक्षयने सासऱ्यांचा बंगला का विकला? ते माझ्या हिरोचं घर... आशीर्वाद बंगल्याबद्दल बोलताना मुमताज म्हणाल्या, 'राजेश खन्नांनी किती...'

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी ! 'या' सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार १० ते १६ लाखांची थकबाकी

Fact Check: गिरीश महाजनांची कोंडी करणारी महिला खरंच Bigg Boss मधील पूजा मिश्रा? अखेर सत्य आलं समोर

SCROLL FOR NEXT